MNS: आता शिवसेना भवनासमोरच मनसेचा रथातून हनुमान चालिसा, यशवंत किल्लेदार पोलिसांच्या ताब्यात; भोंगेही जप्त

| Updated on: Apr 10, 2022 | 8:18 AM

mns: गुढी पाडव्यापासून मनसे मुंबईत अधिकच आक्रमक झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालिसा (hanuman chalisa) सुरू करण्याचा इशारा दिला होता.

MNS: आता शिवसेना भवनासमोरच मनसेचा रथातून हनुमान चालिसा, यशवंत किल्लेदार पोलिसांच्या ताब्यात; भोंगेही जप्त
आता शिवसेना भवनासमोरच मनसेचा रथातून हनुमान चालिसा, मनसे मुंबईत आक्रमक
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: गुढी पाडव्यापासून मनसे (mns) मुंबईत अधिकच आक्रमक झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालिसा (hanuman chalisa) सुरू करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मनसे सैनिकांनी मुंबईत हनुमान चालिसा लावण्यास सुरुवात केली आहे. घाटकोपरच्या चांदिवलीमध्ये सर्वात आधी हनुमान चालिसा लावल्यानंतर आज राम नवमीचं निमित्त साधून मनसे सैनिकांनी चक्क शिवसेना भवनासमोरच हनुमान चालिसा लावला आहे. एका टॅक्सीवजा रथावर भोंग्या लावून हा हनुमान चालिसा लावण्यात आला आहे. हा रथ मुंबईतील काही भागात फिरवला जाणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे येत्या काळात अधिक आक्रमक होण्याची चिन्हे असून त्यामुळे मुंबईतील राजकारण ढवळून निघणार आहे. दरम्यान, शिवसेना भवनासमोर भोंगे लावल्याप्रकरणी पोलिसांनी यशवंत किल्लेदार यांना ताब्यात घेतले आहे. तसेच भोंगेही जप्त केले आहेत.

शिवसेनेचे नेते यशवंत किल्लेदार यांच्या पुढाकाराने दादरच्या शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा लावण्यात आला आहे. राम नवमीचं निमित्त साधून आज सकाळीच शिवसेना भवनासमोरच हा रथ आणण्यात आला. त्यावर भोंग्या लावण्यात आला होता. या रथावरून हनुमान चालिसा लावून हा रथ शिवसेना भवनासमोर थांबवण्यात आला होता. मनसेने सेना भवनासमोर हनुमान चालिसा लावल्याचं कळताच या ठिकाणी हळूहळू गर्दीही जमली होती. मनसेच्या स्थापने नंतर महापालिकेच्या निवडणुकीत दादर-माहीम परिसरात वर्चस्व निर्माण केलं होतं. मात्र, त्यानंतरच्या निवडणुकीत मनसेला मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा दादर-माहीम परिसरात वर्चस्व निर्माण करण्यासाठी मनसेकडून हालचाली सुरू करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मनसे सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी रथ

आज राम नवमीचा सण आहे. सर्वच सण मोठ्या प्रमाणात साजरे करण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार आम्ही विविध ठिकाणी राम नवमी जल्लोषात साजरी करत आहोत. मनसे सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हा रथ तयार केला आहे. त्यामाध्यमातून मुंबईतील अनेक भागात जाऊन हनुमान चालिसा लावण्यात येत आहे, असं यशवंत किल्लेदार यांनी सांगितलं.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

गुढी पाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भव्य रॅली पार पडली होती. तब्बल दोन वर्षानंतर राज ठाकरे यांची मुंबईत मोठी रॅली झाली. या पार्श्वभूमीवर राज यांनी आक्रमक भाषण केलं. या भाषणातून त्यांनी महाविकास आघाडीचे पिसे काढली तर भाजपचं कौतुक केलं होतं. याच रॅलीत त्यांनी सर्व मराठी सण उत्साहात साजरे करण्याचे आदेश मनसे सैनिकांना दिले होते. यावेळी त्यांनी मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा हनुमान चालिसा सुरू करू, असा इशारा दिला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील काही भागात मनसे सैनिकांनी हनुमान चालिसाही सुरू केला होता.

संबंधित बातम्या:

Maharashtra News Live Update : राज साहेब जिंदाबाद होते आणि ते जिंदाबादचं राहतील, वसंत मोरे यांचं वक्तव्य

Sanjay Raut: महाराष्ट्रातील एका नेत्याच्या इशाऱ्यावर ईडीच्या कारवाया; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

Maharashtra kesri 2022 : यंदाचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, विशाल बनकरला फायनलमध्ये केलं चितपट