महाराष्ट्रातल्या या गावांमध्ये संध्याकाळी ६ वाजले की हातातील मोबाईलं बंद होतात

| Updated on: Jan 19, 2023 | 10:22 PM

सूर्य मावळतीला आला, अंधारपडू लागतो, एक आवाज कानावर पडला की, या गावांमध्ये हातातले मोबाईल २ तास बंद होतात, यानंतर टीव्हीही बंद होतात, हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

महाराष्ट्रातल्या या गावांमध्ये संध्याकाळी ६ वाजले की हातातील मोबाईलं बंद होतात
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र राज्यात अशी ३ गावं सध्या आहेत, सध्या ही ३ गावं आहेत, पण ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे, तुम्हाला ऐकायला आश्चर्य़ वाटायला नको, पण सूर्यनारायण संध्याकाळी आराम करायला गेले, म्हणजे सूर्य मावळतीला आल्यानंतर, गावात एक आवाज येतो. हा आवाज आधी शाळेतील मुलांना घाबरवून सोडणारा होता.पण आता ते आनंदाने त्या आवाजाचं स्वागतच करतात, कारण सवय व्हायला जरा वेळ जातोच. तंत्र आणि ज्ञान हे २ शब्द एकत्र येऊन तंत्रज्ञान विकसित झालं, याचा मोठ्या प्रमाणात फायदा असला, तरी काही साईड इफेक्ट मात्र जाणवत आहेत. या साईड इफेक्टवर काही गावांनी आता उपाय योजना सुरु केल्या आहेत.गावातील पुढील पिढ्या या जगातील सुरु असलेल्या स्पर्धेशी अधिक सक्षम व्हावीत हा या मागचा उद्देश आहे.

सूर्य मावळतीला आला, अंधारपडू लागतो, एक आवाज कानावर पडला की, या गावांमध्ये हातातले मोबाईल २ तास बंद होतात, यानंतर टीव्हीही बंद होतात, हे ऐकून तुम्हाला नक्की वाटेल, काही तरी काळी जादू आहे. जगात काळी जादू वैगरे असं काही नाही, सर्वच अंधश्रद्धा आहे. पण “गावकरी, ते राव काय करी”, असं म्हणतात, आणि काही गावं आता हे करुन दाखवत आहेत.

लहान शहर आणि मोठ्या शहरात हे नक्कीच अशक्य नाही, पण ग्रामीण भागात आता शहराएवढ्याच सुविधा आल्या आहेत, पण लोकसंख्येच्या मानाने हे मात्र शक्य आहे. कारण शाळेतील मुलं घरी आल्यावर आईवडिलांच्या मोबाईलशी खेळतात. मोबाईलमध्ये देखील व्हीडिओपाहून भरपूर ज्ञान मिळण्यासारखं आहे, पण शॉर्ट व्हीडिओंचा डंका वाढल्याने, तेच ते डान्सचे व्हीडिओ पाहून मुलांचा वेळ कधी आणि कुठे जातो हेच कळत नाही.

हे सुद्धा वाचा

मुलांचा वेळ असा वाया जावू नये, म्हणून महाराष्ट्रातील ३ गावांनी आतापर्य़ंत असा एक वेगळा नियम गावात केला आहे, संध्याकाळी ६ वाजता एक दंवडी दिली जाते, दवंडी म्हणजे एक माणूस येऊन चौकाचौकात सांगतो की, सहा वाजण्याची वेळ झाली आहे, तरी पुढील २ तास आपले मोबाईल आणि टीव्ही बंद करा आणि पालकांना सूचना आहे की, त्यांच्या मुलांचा पुढील २ तास अभ्यास घ्या.

सांगली – मोहित्यांचं वडगाव
धाराशीव-उमरगा तालुक्यातील जेकेकुरवाडी
सोलापूर-पंढरपूरमधील – देवगाव
कोल्हापूर – गडहिंग्लज तालुक्यातील नूल
सोलापूर माढा नगरपंचायत

महाराष्ट्रात गावांची ही यादी वाढत चालली आहे.सध्या ५ ते ६ गावांनी हा निर्णय घेतला आहे, पण यात सातत्य असणे गरजेचे आहे.