कराड : केंद्र सरकारकडून 119 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील सहा दिग्गजांचा समावेश आहे. परंतु ठाकरे सरकारने शिफारस केल्यानुसार केवळ एकाच व्यक्तिमत्त्वाचा ‘पद्म’ने सन्मान करण्यात आला आहे. भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव, दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर, शिवसेना खासदार संजय राऊत, कांगारुंना लोळवणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य राहणे, या दिग्गजांसह 98 मातब्बर व्यक्तींच्या नावांची यादी महाराष्ट्र सरकारने केंद्राला पाठवली होती. त्यापैकी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनाच पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. इतर 97 जणांना प्रतीक्षेत राहावे लागणार आहे. (Modi government should declare that Khashaba Jadhav’s achievement is not eligible for the Padma award)
दरम्यान देशाचे पहिले ऑलम्पिक वीर कराडचे पैलवान खाशाबा जाधव यांची कामगिरी पद्म पुरस्कारासाठी पात्र नाही हे एकदा सरकारने जाहीर करावं, अशी उद्विग्न नाराजीची प्रतिक्रिया खशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव यांनी दिली आहे. वैयक्तिक कुस्ती खेळ प्रकारात भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या दिवंगत खाशाबा जाधव यांना यंदाही पद्म पुरस्कार न दिल्याने राज्यभरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. कुस्तीमध्ये खाशाब जाधव यांनी देशाचे नाव जगभर पोहोचवली. त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सिंधुताई सपकाळ यांचा पद्मभूषण पुरस्काराने सन्मान करण्याची शिफारस राज्य सरकारने केली होती. मात्र त्यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव होणार आहे.
कोणाकोणाच्या नावांची शिफारस?
पद्मविभूषण
प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी
दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर
एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख
पद्मभूषण
सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ,
‘सिरम’चे अदर पूनावाला
स्कायडायव्हर शीतल महाजन
अभिनेत्री माधुरी दीक्षित
अभिनेते मोहन आगाशे
पद्मश्री
लेखक मारुती चितमपल्ली
बालमोहन विद्यामंदिरचे शिवराम (दादासाहेब) रेगे (मरणोत्तर)
लेखक शं.ना. नवरे (मरणोत्तर)
सामाजिक कार्यकर्ते यशवंतराव गडाख
मसालाकिंग धनंजय दातार
कुस्तीपटू खाशाबा जाधव (मरणोत्तर)
नेमबाज अंजली भागवत
क्रिकेटपटू अजिंक्य राहाणे
क्रिकेटपटू स्मृती मानधना
जलतरणपटू वीरधवल खाडे
रंगभूमीकार अशोक हांडे
अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी
शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर
अभिनेता हृतिक रोशन
अभिनेता रणवीर सिंग
अभिनेता जॉनी लिवर
अभिनेता ऋषी कपूर (मरणोत्तर)
अभिनेत्री राणी मुखर्जी
अभिनेते विक्रम गोखले
अभिनेते अशोक सराफ
अभिनेते दिलीप प्रभावळकर
अभिनेता सुबोध भावे
अभिनेता मिलिंद गुणाजी
अभिनेत्री मुक्ता बर्वे
दिग्दर्शक नागराज मंजुळे
संगीतकार अशोक पत्की
संगीतकार अनिल मोहिले (मरणोत्तर)
संगीतकार अजय-अतुल
निवेदक सुधीर गाडगीळ
खासदार संजय राऊत
खासदार डॉ. अमोल कोल्हे
डॉ. जगन्नाथ दीक्षित
आहारतज्ज्ञ डॉ. ऋतुजा दिवेकर
(Modi government should declare that Khashaba Jadhav’s achievement is not eligible for the Padma award)