ग्रामीण भागात कोरोना वाढला, महाराष्ट्रासाठी मोदी सरकारने पाठवली मोठी आर्थिक रसद

| Updated on: May 10, 2021 | 11:24 AM

उत्तर प्रदेशला सर्वाधिक 1441 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. | Modi government covid

ग्रामीण भागात कोरोना वाढला, महाराष्ट्रासाठी मोदी सरकारने पाठवली मोठी आर्थिक रसद
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us on

मुंबई: देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा ग्रामीण भागाला मोठा तडाखा बसताना दिसत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव अधिक खोलवर झाला आहे. तसेच मृतांचा आकडाही झपाटयाने वाढताना दिसत आहे. परिणामी ग्रामीण जीवनाची घडी पूर्णपणे विस्कटण्याची शक्यता आहे. (Modi government releases 8923 crores to 25 states for rural local bodies)

या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठी आर्थिक रसद पाठवली आहे. कोरोनासंबधी उपाययोजना आणि पीडितांना दिलास देण्यासाठी मोदी सरकारने 25 राज्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांना तब्बल 8,923 कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. यापैकी 861 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राच्या वाट्याला आला आहे. तर उत्तर प्रदेशला सर्वाधिक 1441 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.

हे पैसे ग्राम पंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना देण्यात येतील. कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे विकत घेण्यासाठी आणि सुविधा सुदृढ करण्यासाठी हा पैसा वापरता येईल. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान; बाधित आणि मृतांच्या संख्येत मोठी वाढ

एकीकडे मुंबई आणि पुण्यात कोरोनाचा आलेख काहीसा स्थिरावत असताना पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यात मात्र कोरोना हाहा:कार माजवताना दिसत आहे. रविवारच्या आकडेवारीनुसार पश्चिम महाराष्ट्रात काल दिवसभरात 219 कोरोना रुग्णांचा (Coronavirus) मृत्यू झाला. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक मोठ्याप्रमाणावर दिसून येत आहे.

या चार जिल्ह्यांमध्ये मिळून रविवारी कोरोनाचे 6504 नवे रुग्ण आढळून आले. साताऱ्यात 2234 नवे रुग्ण आढळून आले. तर 59 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर सोलापूरात 52 जणांचा मृत्यू तर शहरी भागात 7 जणांचा मृत्यू व ग्रामीण भागात 45 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात काल दिवभरात 1 हजार 908 जणांना कोरोनाची लागण तर 2 हजार 625 जणांना देण्यात आला डिस्चार्ज देण्यात आला.

सांगलीतही अशीच चिंताजनक परिस्थिती आहे. काल दिवसभरात कोरोनाचे 1341 नवे रुग्ण आढळून आले तर 58 जणांनी जीव गमावला. तर कोल्हापूरमध्ये रविवारी एकाच दिवसात 50 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे हे चारही जिल्हे सध्या रेड झोनमध्ये आहेत.

संबंधित बातम्या:

तिसऱ्या लाटेपूर्वीच पुण्यात लहान मुलांना कोरोना संसर्ग! 1 वर्षाखालील 249 चिमुकल्यांना कोरोनाची लागण

आभाळच फाटले! एकापाठोपाठ तीन भावांचा कोरोनामुळे मृत्यू; पुण्यात हळहळ

आमच्यावर विश्वास ठेवा, सरकारच्या कोरोना धोरणात न्यायालयाच्या हस्तक्षेपाची गरज नाही: केंद्र सरकार

(Modi government releases 8923 crores to 25 states for rural local bodies)