मुंबई : ज्या मान्सूनवरच देशातील शेती अवलंबून आहे त्या (Monsoon) मान्सूनचे यंदा कधी नव्हे ते वेळेअगोदरच आगमन होणार आहे. मे महिन्याच्या पंधरवाड्यानंतर प्रत्येकाला उत्सुकता असते ती मान्सूनचे आगमन केव्हा होणार याची. यंदा (Kharif Season) खरीप हंगामाच्या अनुशंगाने मान्सूनचे आगमन केव्हा होणार हे महत्वाचे आहे. शिवाय आगमनाबाबत तर्क-वितर्क लावले जात असतानाच (IMD) भारतीय हवामान विभागाने दिलासा दिला आहे. यंदा मान्सूनचे आगमन हे वेळेपूर्वीच होणार आहे. आठवड्याभरात आंदमानमध्ये मान्सून धडकणार असल्याचे सांगितले आहे. तर तळकोकणात देखील 27 मे ते 2 जून दरम्यान मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे.
आयएमडीचा येत्या 04 आठवड्यांत पावसाचा अंदाज;
आठवडा 1: अंदमान समुद्रावर वर्धित पावसाची शक्यता.
आठवडा 2 आणि 3 :अरबी समुद्रावरील वर्धित पावसाची शक्यता दर्शवते.
दुसरा आठवडा आणि त्यापुढील आठवड्यात दक्षिण द्वीपकल्प आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता . https://t.co/usAqxcEsar हे सुद्धा वाचा— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 12, 2022
यंदा मान्सून समाधानकारक बरसणार असल्याचे यापूर्वीच भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर आता तो वेळे अगोदरच दाखल होणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील चार आठवड्याचे अंदाज वर्तवले आहेत. यामध्ये ही माहिती समोर आली आहे. 13 ते 19 मे च्या दरम्यान अंदमानच्या समुद्रावर पाऊस होऊ शकतो. तर आंदमनात मान्सून हा 22 मे पर्यंत दाखल होत असतो मात्र, तो देखील आता वेळीपूर्वीच येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. तर केरळात 20 ते 26 मे दरम्यान तो सक्रीय होईल असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
भारतीय हवामान विभागाने 4 आठवडे कसे राहतील याबाबत अंदाज वर्तवला आहे. यामध्ये मान्सूनचे आगमन तर वेळेपूर्वीच होणार हे स्पष्ट झालं आहे पण राज्यात केव्हा मान्सून दाखल होणार याची माहिती ही 15 मे रोजी दिली जाणार आहे. तळकोकणात आणि मुंबईच्या काही भागात जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस होणार असल्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.
सध्या शेतकऱ्यांना खरिपाची लगबग लागली असून शेतजमिनी मशागतीची कामे सुरु आहेत. वेळेत पाऊस झाला तर उत्पादनात वाढ होणार आहे. शिवाय परतीच्या पावसाचा धोका राहणार नाही. गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकरी तत्पर झाला असून पावसाने जर साथ दिली तर उत्पादनात वाढ होणार आहे.