Monsoon Update : कोकणसाठी ऑरेंज अलर्ट, महाराष्ट्रात पावासाचा जोर वाढला, या भागात मुसळधार पाऊस

| Updated on: Jun 26, 2023 | 10:18 AM

महाराष्ट्रात सध्या अनेक जिल्ह्यात पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात आहे. त्याचबरोबर काही भागात अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Monsoon Update : कोकणसाठी ऑरेंज अलर्ट, महाराष्ट्रात पावासाचा जोर वाढला, या भागात मुसळधार पाऊस
heavy rain in maharashtra
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रात मान्सूनपूर्व (Monsoon Update) पावसाने सुरुवात केली. काल महाराष्ट्रातील (maharashtra rain update) अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून नाशिक, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात आज अतिवृष्टी (heavy rain in maharashtra) होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तीन जिल्ह्यांना डोंगराळ घाट असल्याने त्या भागात मुसळधार पाऊस होणार आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे वातावरणात चांगलाचं गारवा पसरला आहे. या आठवड्यात महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात असाचं पाऊस राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोकणासाठी पुढचे दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दोन दिवसांपासून नागपूरच्या काही भागात मुसळधार पाऊस होत आहे. सकाळी काहीवेळ पावसाने विश्रांती घेतली होती. आता सर्वत्र आता ढगाळ वातावरण आहे. सध्याचा पाऊस हा शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरला आहे.

कोकणासाठी पुढचे दोन दिवस ऑरेंज अलर्ट

कोकणात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पुढचे अजून दोन दिवस हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्यरात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्याचबरोबर किनारपट्टी भागात पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

अकोल्यात रिमझिम पावसाला सुरवात

अकोला जिल्ह्यात कालपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वातावरणाचा चांगलाचं गारवा पसरला आहे.

उन्हाच्या चटक्यापासून नागरिकांना दिलासा

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार काल रात्रीपासून गोंदिया जिल्ह्यातील हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरु झाला आहे. उन्हाच्या काहिलीने आता नागरिकांची सुटका होणार असून हा पाऊस शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असून या पावसानंतर शेतीचे कामे सुरू होणार आहेत.

मुंबईमध्ये पावसाचे आगमन झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून सर्व ठिकाणी अधूनमधून पाऊस पडत आहे. सध्या अंधेरी परिसरात ही काल रात्रीपासून अधूनमधून पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने आजही मुंबईत यलो अलर्ट जारी केला आहे, मुंबईमध्ये आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईच्या काही सकल भागात पाणी साचत असल्यामुळे तिथं पर्यायी व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीत सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरु आहे. अनेक रस्त्यावर पाणी साचण्यास सुरवात झाली आहे.