नागपुरातून अट्टल मोटार बाईक चोराला अटक, 10 गाड्या जप्त

| Updated on: Jan 01, 2021 | 9:09 PM

नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांनी एका मोपेड चोराला अटक केली आहे. (Motorbike Theft Arrest In Nagpur)

नागपुरातून अट्टल मोटार बाईक चोराला अटक, 10 गाड्या जप्त
अटक
Follow us on

नागपूर : नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांनी एका मोपेड चोराला अटक केली आहे. त्याच्या कडून 10 मोपेड गाड्या जप्त केल्या आहेत. या सगळ्या गाड्या त्याने शहराच्या वेगवेगळ्या भागातून चोरी केल्या होत्या. (Motorbike Theft Arrest In Nagpur)

गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोटार बाईक चोरी होण्याच्या घटना वाढल्या होत्या. याबाबतच्या अनेक तक्रारी पोलिसांनी आल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिसांनी एक पथक बनवून विविध ठिकाणी पाळत ठेवायला सुरुवात केली.

काही दिवसांपूर्वी नागपुरातील महाराज बाग परिसरात चोरी करताना एक चोरटा पोलिसांच्या हाती लागला होता. यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. यावेळी त्याने शहराच्या वेगवेगळ्या भागातून 10 मोपेड चोरी केल्याची कबुली दिली.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नागपुरात वाहन चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यावर वेळीच निर्बंध लावला नाही तर त्यात आणखी वाढ व्हायला वेळ लागणार नाही. (Motorbike Theft Arrest In Nagpur)

संबंधित बातम्या : 

मुंबईत धक्कादायक घटना! सासऱ्याने केली सुनेची हत्या, कारण वाचून हादराल

कुत्र्यांसाठीचे इंजेक्शन, मात्र गुदमरुनच मृत्यू, डॉ. शीतल आमटे आत्महत्याप्रकरणात नवनवे खुलासे