नाशिक : भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली होती. त्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी पलटवार केला आहे. यामध्ये अमोल कोल्हे यांनी आमदार नितेश राणे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी टीव्ही 9 मराठीशी बोलत असतांना अमोल कोल्हे म्हणाले, कोण नितेश राणे? आणि कुठल्या पक्षात आहे? नितेश राणेंची भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे का? भाजपचं राणेंना किंमत देत नाही, जे वडीलांच्या कर्तृत्वावर पोळ्या भाजणारे आहेत, बोलतांना संस्कार प्रकट होत असतात याचा विचार करा असा टोलाच कोल्हे यांनी लगावला आहे. याशिवाय नितेश राणे यांचे नाव घेणं टाळत त्यांनी छ. संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचवण्यासाठी काही योगदान दिलं आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.
कला क्षेत्र हे माझ्या उत्पन्नाचं साधन आहे, मी उजळ माथ्याने सांगतो असं राणेंनी सांगावं असेही आवाहन कोल्हे यांनी केले आहे.
सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मला आलेल्या लोकांनी जास्त बोलू नये, महाराष्ट्रच्या राजकारणाला सुसंस्कृत पणाचा आदर्श आहे.
जर माईक वर बोलायचं असेल तर मला ही बोलता येत.पण मी जे करतो हे त्यांना जमत का? इतिहास मांडण्यासाठी मी राजकारण आणत नाही असेही अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे.
राणेंनी जर काही योगदान दिले का? क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे, असे म्हणत राणेंच्या शब्दशैलीवर अमोल कोल्हे यांनी बोट ठेऊन सुनावलं आहे.
इतकंच काय मी सिंधुदुर्ग मध्ये नक्की कार्यक्रमाचे प्रयोग करेल, ते याची देही याची डोळा त्यांनी पाहावं असेही अमोल कोल्हे यांना ठणकावून सांगितलं आहे.
नितेश राणे यांनी अमोल कोल्हे यांना 24 ला आपटून टाकू असे म्हणत पैसे घेऊन रोल करतो असे म्हणत दाढी काढली तर कोणी ओळखतं का अशी टीका केली होती. त्यावर कोल्हे यांनी पलटवार केला आहे.