नवनीत राणांच्या जीवीतास धोका? शिवसेनेच्या कथित लेटरहेडवर अ‌ॅसिड फेकण्याच्या धमकीमुळे खळबळ

| Updated on: Feb 16, 2021 | 6:25 PM

शिवसेनेच्या कथित लेटरहेडवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Kaur Rana) यांच्यावर अ‍ॅसिड फेकण्याची अज्ञाताने धमकी दिली आहे.

नवनीत राणांच्या जीवीतास धोका? शिवसेनेच्या कथित लेटरहेडवर अ‌ॅसिड फेकण्याच्या धमकीमुळे खळबळ
नवनीत राणा
Follow us on

नवी दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Kaur Rana) यांच्यावर अ‍ॅसिड फेकण्याची अज्ञाताने धमकी दिली आहे. या प्रकारमुळे खळबळ उडाली असून धमकीचे पत्र शिवसेनेच्या कथित लेटरहेडवर असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या धमकीच्या पत्रात शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याचे नाव नाही. मात्र, या प्रकाराची दखल घत नवनीत राणा यांनी शिवसेनेनं धमकी दिल्याचा आरोप करत दिल्लीतील नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आपल्या तक्रारीत त्यांनी हे धमकीचे पत्र शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या इशाऱ्यावर पाठविण्यात आल्याचा दावा केला आहे. (MP Navneet Kaur Rana threatened by unknown person to kill her by acid attack)

राणा यांच्यावर अ‌ॅसिड फेकण्याची धमकी

मागील काही दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, वाढीव वीजबिल अशा अनेक मुद्द्यवर त्यांनी सरकारवर टीका करत या घटकांना न्याय देण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांना एक धमकीचे एक पत्र आले आहे. या पत्रात त्यांच्यावर अ‌ॅसीड फेकण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकारची दखल घेत त्यांनी या दिल्लीतील नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नवनीत राणा यांना आलेले धमकीचे पत्र शिवसेनेच्या कथित लेटरहेडवर असल्यामुळे राणा यांनी शिवसेनेवर थेट आरोप केले आहेत. या पत्रात अर्वाच्य भाषेचा वापर करण्यात आला आहे. तसेच ही धमकी शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या इशाऱ्यावर पाठविण्यात आल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला आहे.

लेटरहेडवर कोणत्याही शिवसेना नेत्याचे नाव नाही

दरम्यान, नवनीत राणा यांना आलेल्या धमकीच्या पत्रावर कोणत्याही शिवसेना नेत्याचे नाव नाही. तसेच, हे पत्र शिवसेनेच्या खऱ्या लेटरहेडवर असल्याची कोणतीही पुष्टी अजून झालेली नाही. असे असले तरी नवनीत राणा यांनी तक्रार केल्यानंतर शिवसेनेची काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्वाचे आहे.

इतर बातम्या :

म्हणून आम्ही ठाकरे सरकारला स्थगिती सरकार म्हणतो, नवनीत राणांची लोकसभेत फटकेबाजी

महाराष्ट्रात ठाकरे सरकारला आम्ही स्थगिती सरकार नावं दिलं, लोकसभेत नवनीत राणा कडाडल्या

(MP Navneet Kaur Rana threatened by unknown person to kill her by acid attack)