“खंडणी गोळा करण्यासाठीच पालकमंत्रीपद मागून घेतलं”, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदेंवर नाव न घेता मोठा आरोप

| Updated on: Jan 03, 2025 | 11:26 AM

शिवसेना संस्कार संस्कृती आणि शिष्टाचार या त्रिसूत्रीवर काम करणारा पक्ष आहे. आम्हाला आणखी पाच वर्षे विरोधी पक्षात काम करावे लागेल. राज्याच्या विकासामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचे काम मोठं असावं लागतं, असेही संजय राऊतांनी म्हटले.

खंडणी गोळा करण्यासाठीच पालकमंत्रीपद मागून घेतलं, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदेंवर नाव न घेता मोठा आरोप
eknath shinde sanjay raut
Follow us on

“आम्हाला आणखी पाच वर्षे विरोधी पक्षात काम करावे लागणार आहे. राज्याच्या विकासामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचे काम मोठं असावं लागतं. शिष्टाचार म्हणून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले असतील. पण सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सतत संवाद सुरू असतो. त्याची अनेक साधने असतात आणि त्या साधनांचा वापर होत असतो”, असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सामना अग्रलेखात देवेंद्र फडणवीसांच्या गडचिरोली दौऱ्यावरुन करण्यात आलेल्या कौतुकावर भाष्य केले आहे. तसेच यावेळी संजय राऊतांनी माजी मुख्यमंत्री आणि आताचे उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “गडचिरोलीत विकासाची गंगा वाहत असेल तर त्याचा जर कोणी कौतुक करणार नसेल तर ते चुकीचं आहे. या आधीच्या पालकमंत्र्यांचे काम आम्ही पाहिलं आहे,म्हणून मला विकासाचा काम महत्त्वाचे वाटले. या जिल्ह्यातून येणारे खंडण्या गोळा करायचं काही लोकांनी ठरवलं होतं”, असा आरोप संजय राऊतांनी केला.

राजकीय वैर दूर ठेवून त्यांचे कौतुक केले पाहिजे

“सरकारचे आणि त्यांच्याशी नक्कीच राजकीय मतभेद आहेत. मतभेद असल्यावर एकमेकांवर टीका होते. महाराष्ट्रातील राजकारण टीकेपुरता मर्यादित राहिलेला नाही. सरासरी टीका व्हायला लागली आहे, तरीही आपण काही देणं लागतो. त्यांनी एखाद्या चांगलं पाऊल उचललं असेल आणि राज्याची कायदा सुव्यवस्था सामाजिक समीकरणे यांना दिशा देणार असेल तर सर्व राजकीय वैर दूर ठेवून त्यांचे कौतुक केले पाहिजे. ही भूमिका शिवसेनेची हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

“देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक का करू नये, गडचिरोलीसारखा जिल्हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो तिथे ज्या प्रकारचा हत्याकांड असेल, पोलिसांचे बळी गेले, सामान्य माणसांचे बळी गेले. नक्षलवादात हा जिल्हा विकासापासून वंचित राहिला. हे सुवर्णभूमी आहे, ही पोलाद सिटी म्हणून ओळखली जाईल. जमशेदपूरनंतर गडचिरोलीला पोलाद सिटी बनविले जात असेल आणि तिकडच्या बेरोजगारांच्या हाती काम मिळून नक्षलवाद दूर होणार असेल, तर ते या राज्याच्या हिताचं असेल”, असे संजय राऊतांनी म्हटले.

“नक्षलवाद नष्ट होणार असेल तर…”

“देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर दहा खतरनाक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यांनी संविधान हाती घेतलं. याचा प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला कौतुक असलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा चांगले काम केले, तेव्हा त्यांचे कौतुक केलं. गडचिरोलीत विकासाची गंगा वाहत असेल आणि त्याचे जर कोणी कौतुक करणार नसेल, तर ते चुकीचं आहे. या आधीच्या पालकमंत्र्यांचे काम आम्ही पाहिलं आहे. म्हणून मला विकासाचा काम महत्त्वाचे वाटले. या जिल्ह्यातून येणारे खंडण्या गोळा करायचं, काही लोकांनी ठरवलं होतं. एकाला करून खंडणी हप्ते गोळा करण्यासाठीच आहे. त्यातून महाराष्ट्राचा काही फायदा झाला नाही, नक्षलवाद हा गरीबी अनेक बेरोजगारीतून निर्माण झालेला राक्षस आहे. नक्षलवाद नष्ट होणार असेल आणि मुख्यमंत्र्यांनी पाऊल उचललं असेल तर ते विधायक आहे. त्याचा अभिनंदन आणि कौतुक करणं आपल्या सर्वांचं काम आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.

यात जवळीक साधण्याचा प्रयत्न काय आहे. शिवसेना संस्कार संस्कृती आणि शिष्टाचार या त्रिसूत्रीवर काम करणारा पक्ष आहे. आम्हाला आणखी पाच वर्षे विरोधी पक्षात काम करावे लागेल. राज्याच्या विकासामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचे काम मोठं असावं लागतं, असेही संजय राऊतांनी म्हटले.

एकनाथ शिंदेंचे नाव न घेता टोला

कोणाचाही आवडता जिल्हा नसतो. जमिनीत काय लागतं, काय उगवते, काय पेरणी करून कापायला मिळते, त्याच्यावर आवडता जिल्हा निर्माण होतो. मुख्यमंत्र्यांनी पोलाद सिटी बनवली आहे. आधीचे पालकमंत्री यांनी गडचिरोली यासाठी मागून घेतलं होतं की तिथलं पोलाद खाणींचा उद्योग आहे. त्यांच्याकडून ज्या पद्धतीने खंडणी गोळा करण्यासाठी काही पांडव नेमले होते, तिथे कौरवाचं काम कसं करत होते. ते महाराष्ट्राने पाहिलं आहे म्हणून आम्हाला आशेचा किरण दिसला, असेही संजय राऊत म्हणाले.