डॅमेज कंट्रोल रोखू न शकलेले संजय राऊत म्हणाले, गेलेले नगरसेवक दलाल…गेलेल्या नगरसेवकांचे धंदेही सांगितले

| Updated on: Dec 16, 2022 | 10:48 AM

ठाकरे गटातून शिंदे गटात नाशिकमधील 11 नगरसेवकांनी प्रवेश केल्यानं संजय राऊत चांगलेच भडकले असून जहरी टीका केली आहे.

डॅमेज कंट्रोल रोखू न शकलेले संजय राऊत म्हणाले, गेलेले नगरसेवक दलाल...गेलेल्या नगरसेवकांचे धंदेही सांगितले
Image Credit source: TV9 Network
Follow us on

मुंबई : जामीनावर बाहेर सुटल्यानंतर संजय राऊत यांनी नाशिकमध्ये दोनदा दौरा केला. नाराज असलेल्या अनेक नगरसेविकांची संजय राऊत यांनी वन टू वन मुलाखती घेतल्या. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी दोनदा प्रयत्न करूनही संजय राऊत यांना यश आलेले नाहीत. नुकतेच ठाकरे गटाच्या अकरा नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित बाळसाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदे गटात नाशिकमधून पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाल्यानं उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात असून संजय राऊत यांचं हे अपयश असल्याची चर्चा आहे. असे असतांना संजय राऊत यांनी मात्र शिंदे गटात दाखल झालेल्या नगरसेवक दलाल असल्याचे म्हंटले असून जहरी टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले, ते आधीच गेले होते. तीन लोकांची हकालपट्टी आम्ही आधीच केली आहे. अख्ख्या महाराष्ट्रातून काही लोक गेले. त्यातील काही दलाल आहेत.

जमिनीचे व्यवहार करणारे. लालच आणि कमी कुवतीचे लोक आहेत. त्यांना निष्ठा आणि श्रद्धा नाही. जे गेले आहेत त्यांचा व्यवसाय दलाल आहेत.

हे सुद्धा वाचा

ज्यांचं सरकार तिकडे ते असतात. २०२४ ला हे झुंड आमच्या दारात उभे दिसतील. ही पद्धत आहे. त्यातील हे काही लोक आहेत. हे लोक इकडे तिकडे फिरत असतात.

शिंदे गटात गेलेल्यांना जाणीव आणि निष्ठा नाही. ज्या दिवशी सरकार पडेल त्या दिवशी ते बेवा होतील आणि परत आमच्या दारात येतील. आम्ही त्यांना घेणार नाही असं राऊत यांनी म्हंटलं आहे.

संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर आता शिंदे गटात दाखल झालेले नगरसेवक राऊत यांच्यावर काय पलटवार करतात हे पाहावं लागेल.