मुंबई : नाशिकमधील ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार आहे. यामधील नावे गोपनीय असले तरी ठाकरे गटाला मोठे खिंडार पडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे आजच्या दिवशी संध्याकाळी संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर येणार आहे. नाशिकमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत बैठक घेणार आहे. याशिवाय नाशिकमध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर सभा घेण्याची तयारी केली जात आहे. याच दरम्यान नाशिकच्या संपर्कप्रमुक पदी कुणाची नियुक्ती केली अशी चर्चा असतांनाच नाशिकमधील ठाकरे गटाच्या पन्नस जणांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. त्यावर संजय राऊत यांनी मात्र या प्रवेशावर खिल्ली उडवली आहे. संजय राऊत यांनी येडेगबाळे पकडून प्रवेश करतात, त्यांची नावं कुणाला माहिती नाही म्हणत टोला लगावला आहे.
दोनचार दलाल, ठेकेदार इकडे-तिकडे गेले असतील तर नाशिकची शिवसेना जागेवर आहे असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
मेंढरे पकडायची आणि भरायची असं सुरू आहे, जे जात आहे त्यांची नावही आम्हाला माहीती नाही असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
कुणालाही पकडायचे आणि पदाधिकारी सांगायचे असे करतात, असा टोला लगावत संजय राऊत यांनी या पक्षप्रवेशावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यापूर्वी नाशिकमधील दोन आमदार, एक खासदार आणि संपर्कप्रमुख, विरोधी पक्षनेते 14 हून अधिक नगरसेवक, जिल्हाप्रमुख आणि इतर कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.
यानंतर नाशिक दौऱ्यावर राऊत येत असतांना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.