नाशिक : ठाकरे गटाला नाशिकमध्ये खिंडार पडल्यानंतर आणि जानेवारीला शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांची सभा होणार असल्याने त्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी गंगापूर रोड परिसरातील नगरसेवकांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावत संजय राऊत यांनी क्रिकेटचे मैदान गाठले होते. यावेळी संजय राऊत यांनी हातात बॅट घेऊन फटकेबाजी केली आहे. बॉक्स क्रिकेटमध्ये संजय राऊत हे क्रिकेट खेळले आहे. यावेळी संजय राऊत यांच्या सोबत नाशिकमध्ये पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मागील वेळेला आउट झालेले संजय राऊत यावेळी मात्र नाबाद राहिले आहे. संजय राऊत यांनी यावेळी जोरदार बॅटिंग केली आहे. यादरम्यान संजय राऊत यांनी भाषण करत राजकीय फटकेबाजी केली आहे. संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना फटकेबाजी करत राहण्याचा सल्ला दिला आहे.
संजय राऊत यांच्या उपस्थित नाशिकमध्ये क्रिकेट सामान्यांचे उद्घाटन करण्यात आले आहे, यावेळी संजय राऊत यांनीही बॅटिंग केली आहे.
यावेळी संजय राऊत यांनी बॅटिंग करत उपस्थितांना तुम्हीही राजकीय फटकेबाजी करा असे म्हंटले आहे. यावेळी संजय राऊत यांनी माझा आणि तसा क्रिकेटचा संबंध नाही असे म्हंटले आहे.
क्रिकेट खेळणारी मुलं उड्या हिचं पोरं भगवा खांद्यावर घेणार आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना राजकारणात येण्याचा एकप्रकारे सल्ला दिला आहे.
खिलाडू वृत्ती राजकारणातून कमी होत चालली आहे अशी कबुली संजय राऊत यांनी देत बाळासाहेबांना राजकारणात अशीच खिलाडू वृत्ती अपेक्षित होती असं म्हंटलं आहे.
मैदानात चांगली फटकेबाजी करत जा, मला तुम्ही कायम धुलाई करायला बोलावतात असं म्हणत संजय राऊत हे चांगलेच आक्रमक झाले आहे.
हे छोटे मैदान आहे, पुढे आपल्याला मोठ्या मैदानात लढायच आहे असे सांगून निवडणुकीच्या तयारी लागा असेही संजय राऊत यांनी म्हंटले आहे.