प्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आजही भाजपसोबत असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. त्यावरून संपूर्ण राज्यात राजकीय चर्चेला उधाण आले होते. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया देऊन आंबेडकर यांच्यावादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही भाष्य केले आहे. यावेळी बोलतांना खासदार सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहे. याशिवाय त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मोठं भाष्य केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे हेच खरे बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे वारसदार असल्याचे म्हंटले आहे. शिवसेना फूटीवर सुप्रिया सुळे यांनी हे भाष्य केलं आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल करत असतांना म्हंटलंय, केंद्र सरकार आणि राज्यातील एकनाथ शिंदेच सरकार सुडाचं राजकारण करतंय.
आम्ही एवढी वर्ष सत्तेत होतो पण सुडाचं राजकारण कधी केलं नाही, सत्तेत आल्यावर कधी करणार नाही, विरोधात असेल तर पक्षात प्रवेश केला की माफ असं सुरू आहे.
वंचित आणि ठाकरे युतीवर जयंत पाटील बोलले आहे, जयंतरावांच स्टेटमेंट पुन्हा ऐका आणि मला प्रश्न विचारा असं म्हणून सुप्रिया सुळे यांनी त्यावर बोलणं टाळलं आहे.
सुरू असलेलं सुडाचं राजकारण वाईट आहे, उद्वव ठाकरेंच्या वडिलांचे पक्ष उभा करण्यात कष्ट आहेत, उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरेंच नावं ठरलं होतं
त्यामुळे उद्धव ठाकरेंना विरोध करणं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या निर्णयाला विरोध करणं असं आहे, अशी स्पष्ट प्रतिक्रिया सुळे यांनी दिली आहे.
विधानपरिषदेच्या निवडणूकीत पास होण्यासाठीचं परीक्षेला बसलोय असं सांगत सध्याच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीवर फारसं भाष्य सुळे यांनी न करता प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहे.