भावापेक्षा ते मित्र जास्त, नेहमी सहकार्य असेल पण…संभाजीराजे यांच्या राजकीय भूमीवर उदयनराजे म्हणाले…

| Updated on: Feb 12, 2023 | 2:57 PM

संभाजीराजे छत्रपती यांच्या याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नाशिक दौऱ्यावर असलेले उदयनराजे यांनीही भाष्य केलं आहे. उदयनराजे यांनी संभाजी राजे छत्रपती यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

भावापेक्षा ते मित्र जास्त, नेहमी सहकार्य असेल पण...संभाजीराजे यांच्या राजकीय भूमीवर उदयनराजे म्हणाले...
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : खासदार उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale ) यांनी संभाजीराजे छत्रपती ( Sambhajiraje Chhatrapati ) यांच्या स्वराज्य संघटना ( Swarajya )  राजकीय पक्ष करण्याच्या भूमिकेवर भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती हे नाशिक दौऱ्यावर आहे. त्यामध्ये संभाजीराजे यांचा वाढदिवस असल्याने नाशिकमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच दरम्यान भाषण करत असतांना संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटना राजकीय पक्ष ( Political Party ) होणार असल्याचे जाहीर केले आहे. इतकंच काय 2024 च्या निवडणुका देखील स्वराज्याच्या माध्यमातून लढणार असल्याचे म्हंटले आहे. एकूणच संभाजीराजे छत्रपती यांनी स्वतः पक्ष काढणार असल्याचे जाहीर केले आहे.

संभाजीराजे छत्रपती यांच्या याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नाशिक दौऱ्यावर असलेले उदयनराजे यांनीही भाष्य केलं आहे. उदयनराजे यांनी संभाजी राजे छत्रपती यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

संभाजीराजे यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. प्रत्येकाने महत्वाकांक्षी असणं काही चुकीचं नाही. संभाजीराजे यांनी काही दूरदृष्टि ठेऊन निर्णय घेतला असेल. त्यांनी काय नियोजन केलं त्याबाबत कल्पना नाही.

हे सुद्धा वाचा

समाजाच्या हिताचे असेल तर आमचं सहकार्य राहील. ते काही परके नाही, भावापेक्षा मी त्यांना मित्रम्हणून मानतो. त्यांनी स्वराज्य पक्ष स्थापन केला आहे. त्यात कोण आहे माहिती नाही.

आम्ही वेगळो नव्हतो, माझं कुणाशीही भांडण नाही. फक्त मी माझे प्रिन्सिपल बघतो असं उदयनराजे भोसले यांनी म्हंटलं आहे. एकूणच उदयनराजे यांनी संभाजीराजे यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.

12 मे 2022 रोजी संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटना स्थापन करणार असल्याचे पुण्यात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. त्यानंतर राजकीय पक्ष नसताना विविध ठिकाणी स्वराज्य संघटनेला यश मिळाले आहे.

स्वराज्य संघटनेला मिळालेले यश पाहता राजकीय पक्ष काढावा अशी मागणी महाराष्ट्रात दौरा करत असतांना नागरिक म्हणत होते असं संभाजीराजे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात स्पष्ट केले आहे.

याशिवाय राज्यात सुरू असलेल्या राजकारण्यांना जनता कंटाळलेली आहे. त्यामुळे अनेक लोकांनी माझ्याकडे अपेक्षा व्यक्त करून दाखविल्या आहेत. त्यामुळे स्वराज्य संघटना शंभर टक्के राजकारणात येणार असल्याचे म्हंटले आहे.

याशिवाय संभाजी राजे छत्रपती यांनी 2024 च्या निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे याबाबत संपूर्ण महाराष्ट्र फिरून लवकरच याबाबत निर्णय घेणार असल्याचे स्पष्टीकरण नाशिकमध्ये पत्रकार परिषदेच्या दरम्यान दिले आहे.