मुंबई : तब्बल दोन वर्षानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (महाराष्ट्र दुय्यम सेवा) पीएसआय पदाच्या शारीरिक चाचणीच्या तारखा केल्या जाहीर केल्या आहेत. 2019 साली पीएसआय पदाची मुख्य परीक्षा झाली होती. 19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरदरम्यान पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी पीएसआय पदासाठी शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे.
तब्बल दोन वर्षानंतर एमपीएससीने ( महाराष्ट्र दुय्यम सेवा ) पीएसआय पदासाठी घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणीची तारीख जाहीर केली आहे. 2019 साली पीएसआय पदाची मुख्य परीक्षा झाली होती. त्यानंतर आतापर्यंत म्हणजेच तब्बल दोन वर्षांपासून ही भरती प्रक्रिया रखडली होती. कोरोना, मराठा आरक्षणाचा मुद्दा तसेच एमपीएससीच्या दिरंगाईपणामुळे ही भरती प्रक्रिया लांबली होती. मात्र आता शेवटी आयोगाना पीएसआय पदासाठी घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान पुणे, नाशिक, आणि कोल्हापूर या शहरांत शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. 496 पदांसाठी ही शारीरिक चाचणीची प्रक्रिया राबवली जात आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी आमखी 100 जागा वाढवल्या आहेत. या जाहिरातीप्रमाणे एकूण 290 पदांसाठी 16 संवर्गात भरती होणार होती. मात्र, आता ही पदसंख्या वाढवण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. आयोगाने थेट 100 पदं वाढवली आहेत. त्यामुळे आता 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. पदांच्या संख्येत वाढ झाल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यासाठी आज एमपीएससीनं नवीन परिपत्रक जारी केलंय. यामध्ये एकूण 20 संवर्गात 390 पदांची जाहिरात करण्यात आली आहे. क्लास 1 ( गट अ च्या ) 100 जागा वाढल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
इतर बातम्या :
VIDEO: शिवसेनेतून माझी हकालपट्टी?, उगाच काही तरी म्हणू नका; राणे मीडियावरच भडकतात तेव्हा…
काल बहिष्कार, आज नाव टाळलं, फडणवीस म्हणतात, ही तर कोकणासाठी मोदींची भेट
भंगाराचा व्यवसाय करता करता त्यांनी मतीही भंगारात विकलीय, नवाब मलिकांवर पडळकरांची टीका
(mpsc announced psi physical test date 2019 maharashtra exam will held in november and december)
‘देवेंद्रजींना बोलावल नाही, राज्यपालांना विमानातून उतरवल तितच यांचा कोतेपणा दिसतो’, भातखळकरांचा टोला https://t.co/xMlL2Dpa0G @Dev_Fadnavis @OfficeofUT @BhatkhalkarA @MeNarayanRane @ShivSena #DevendraFadnavis #UddhavThackeray #NarayanRane #ChipiAirport #AtulBhatkhalkar
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 9, 2021