रेल्वेच्या IRCTC वेबसाईटवर एसटीचे तिकीट आरक्षित करता येणार, रेल्वे आणि महामंडळात करार

| Updated on: Sep 13, 2023 | 6:46 PM

महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या एसटी बसेसचे आरक्षण आता रेल्वेच्या आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुनही करता येणार आहे. रेल्वे आणि महामंडळात यासाठी सामजस्यं करार करण्यात आला आहे.

रेल्वेच्या IRCTC वेबसाईटवर एसटीचे तिकीट आरक्षित करता येणार, रेल्वे आणि महामंडळात करार
MSRTC
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई | 13 सप्टेंबर 2023 : एसटी महामंडळाच्या बसेसचे ऑनलाईन आरक्षण आता रेल्वेच्या आयआरसीटीसी ( IRCTC ) च्या वेबसाईटवरुन करता येणार आहे. त्यामुळे त्यामुळे एसटी बसच्या तिकीटांचे आगाऊ आरक्षण करतानाच्या प्रवाशांच्या अडचणी कमी होतील असे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि आयआरसीटीसीचे अधिकारी यांच्या उपस्थितीत एसटी महामंडळ आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझम कॉर्पोरेशन ( IRCTC ) यांच्या दरम्यान एक सामजंस्य करार करण्यात आला. आयआरसीटीसीचे संकेतस्थळ ( https://www.bus.irctc.co.in ) वरुन प्रवाशांना एसटीचे तिकीट देखील आरक्षित करता येणार आहे.

एसटी महामंडळाच्या एसटी बसेसच्या तिकीटांचे आगाऊ आरक्षण करताना एसटीच्या मोबाईल एप आणि वेबसाईटवरुन अनेकदा प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागायचा. अनेकदा पैसे कट व्हायचे परंतू तिकीट बुक व्हायचे नाही. त्यामुळे या सेवेला खुपच कमी प्रतिसाद मिळत होता. आता ही अडचण दूर करण्यासाठी एसटी महामंडळाने रेल्वेची तिकीट यंत्रणा सांभाळणारी कंपनी आयआरसीटीसी बरोबर सामजंस्य करार केला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासा बरोबर एसटी प्रवासाचे नियोजन एकत्रच करता येणार आहे.

एसटीची प्रवासी संख्या वाढणार

भारतीय रेल्वेचे जवळपास 75 टक्के प्रवासी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरुन रेल्वेची तिकीट आरक्षित करीत असतात. या प्रवाशांना आता एसटीचे तिकीट आरक्षित करण्यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन तिकीट बुक करता येणार आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ होणार आहे. तसेच प्रवाशांना रेल्वे आणि एसटीच्या संयुक्त प्रवासाचे नियोजन करता येईल अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. या कार्यक्रमाला परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पराग जैन नैनुटिया, आयआरसीटीसीच्या व्यवस्थापकीय संचालक सीमा कुमार हे देखील उपस्थित होते.