“हीच सरकारची इच्छा…”, ‘माझी लाडकी बहिण योजने’वर अमृता फडणवीस असं का म्हणाल्या?

| Updated on: Aug 17, 2024 | 9:53 AM

सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. या योजनेवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. आता या योजनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हीच सरकारची इच्छा..., माझी लाडकी बहिण योजनेवर अमृता फडणवीस असं का म्हणाल्या?
Follow us on

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 : राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतंर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. गेल्या दोन दिवसांपासून अनेक महिलांना या योजनेचा लाभ प्राप्त झाला आहे. राज्यातील असंख्य महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे 3000 रुपये जमा झाले आहेत. जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचा निधी एकत्र देण्यात आला आहे. सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. या योजनेवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. आता या योजनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमुळे राज्य सरकारवर टीका केली जात आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना देखील ही योजना का राबवली जात आहे, असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. त्यासोबत ही योजना फक्त विधानसभा निवडणुकीपर्यंतच सुरु राहणर असल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जात आहे. आता या योजनेवर अमृता फडणवीस यांनी भाष्य केले आहे. श्रावण सरी आणि मंगळागौर या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे रक्षाबंधनाचं गिफ्ट आहे. हे पैसे महिलांच्या बचत खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. या पैशांमुळे त्यांची छोटी मोठी गरज असेल त्याला हातभार लागावा, अशीच सरकारची इच्छा आहे. तसेच स्टंटमॅन लोकांनी कोण काय करतंय हे सांगायची गरज नाही. ही योजना सर्वसामान्य महिलांसाठी आहे. त्यामुळे स्टंटमॅन लोकांनी हे स्टंट सुरू आहेत, असे सांगण्याची गरज नाही”, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीसांनी दिली.

हे सुद्धा वाचा

लाडकी बहीण योजना नक्की काय?

महिलांच्या सक्षमीकरता आणि आर्थिक सहाय्याकरिता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. 1 जुलैपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली. या योजनेतंर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट नसून या अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. 31 ऑगस्टनंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.