नवी मुंबई: राज्य सरकारनं लागू केलेल्या संचार बंदीच्या तिसऱ्या दिवशी देखील मुंबई एपीएमसी बाजारातील फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये तुफान गर्दी पहायला मिळाली. दोन्ही मार्केटमध्ये जवळपास १ हजार गाड्यांची आवक झाली असून ग्राहकांनी प्रचंड गर्दी केल्याचं चित्र दिसून आलं. नवी मुंबई शहरात हजाराहून अधिक रुग्ण प्रतिदिन आढळून येत आहेत. तरी मार्केट आवरातील गर्दी मात्र कमी होण्याची नाव घेत नसल्याने शहरवासीय चिंताग्रस्त झाले आहेत. (Mumbai APMC Market Curfew rules violated by peoples there is fear of corona spreading)
मार्केटमधील गर्दीवर कोणतेही नियंत्रण एपीएमसी प्रशासनाकडून ठेवले जात नाही. तर बाजार आवारातील घटक एपीएमसी प्रशासन आणि नवी मुंबई महापालिकेच्या निर्बंधांना कोणतीच भीक घालत नसल्याचे दिसून येत आहे. नुकतेच राज्य सरकारने कडक नियम जाहीर करून सुद्धा येथील व्यापारी आणि ग्राहक त्या नियमांचे पालन करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर, सरसकट नियमांचे उल्लंघन होत असल्याने मुंबई एपीएमसी मार्केट लवकरच कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मार्केटमधील किरकोळ व्यापार बंद ठेवण्यासाठी महापालिका आणि एपीएमसी प्रशासनाने वारंवार किरकोळ व्यापार बंद राहील, अशा सूचना देत आहेत. मात्र, मार्केटमधील किरकोळ व्यापार बंद होत नसल्याने प्रशासन मोठ्या कारवाईच्या विचारात असल्याचे सांगण्यात येत आहे. तर पॅसेज आणि गाडी धक्क्यावर देखील व्यापार केला जात असल्याने नियमांची ऐशीतैशी सुरु आहे. किराणा दुकाने आणि बाजारपेठा येथील गर्दी कमी न झाल्यास राज्य सरकार कठोर पाऊले उचलणार असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यामुळे कोरोना साखळी तोडण्यासाठी एपीएमसी मार्केटमध्ये मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संचालक आणि सुरक्षा रक्षक यांच्या आशीर्वादाने हे किरकोळ व्यापार चालत असल्याची चर्चा मार्केट आवारात सुरु आहे. तर खासगी सुरक्षा रक्षक मास्क वापरत नसल्याने प्रशासनावर देखील आक्षेप घेण्यात येत आहे. त्यामुळे अत्यावश्यक नसताना अनेक व्यापार मार्केटमध्ये चालत असल्याने देखील गर्दी वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.
“ठाण्यात आदमी 1, इंजेक्शन 2, नागपुरात आदमी 2, इंजेक्शन 1, हेवीवेट मंत्र्याकडून बहुत नाइंसाफी”https://t.co/7zdsXEBz7U#Nagpur | #ChandrashekharBawankule | #EknathShinde | #Jitendraawhad | @cbawankule | @mieknathshinde | @Awhadspeaks
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 17, 2021
संबंधित बातम्या:
नवी मुंबई, पनवेलमध्ये अत्यावश्यक सेवावगळता सर्व दुकाने बंद, व्यापारी वर्ग उतरला रस्त्यावर
मुंबईच्या APMC मध्ये नियोजन शून्य कारभार, सभापतींच्या आदेशाला केराची टोपली, कोरोनाचा धोकाही वाढला
(Mumbai APMC Market Curfew rules violated by peoples there is fear of corona spreading)