मुंबईः एका राज्याच्या बजेटएवढा अर्थसंकल्प असणाऱ्या मुंबई (Mumbai) महापालिकेसाठी साऱ्याच पक्षांनी जोरदार कंबर कसलीय. महाराष्ट्रात शिवसेना विरुद्ध भाजपचे रंगलेले आरोप-प्रत्यारोपाचे महानाट्य ही त्याचीच नांदीय. हे कोणीही अगदी दुधखुळे मुलेही समजतील. आता त्याच पार्श्वभूमीवर आज रविवारी सुट्टीच्या दिवशी सकाळी-सकाळी मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ या निवास्थानी जात त्यांची भेट घेतली. या भेटीवरून नाना तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, दोन्ही पक्षाकडून अजूनपर्यंत तरी या भेटीवर कोणीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे ही भेट नेमकी कशासाठी होती, हे गुलदस्त्यात आहे.
भेटीची इतकी चर्चा का?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची यापूर्वी भाजप नेते आशिष शेलार यांनी भेट घेतली होती. त्या भेटीचीही चांगली चर्चा झाली. मात्र, त्यातून काही ठोस असे समोर आलेले दिसले नाही. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी तर दोन्ही पक्षात महापालिका निवडणुकीसाठी युती होणारच, इतपत चर्चा झाली असल्याच्या बातम्या आल्या. मात्र, दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी त्यात काहीही तथ्य नसल्याचे सांगत त्यातून हवा काढली. या साऱ्या पार्श्वभूमीवर मंगलप्रभात लोढा यांनी आज घेतलेली भेट ही विशेष चर्चेची ठरलीय.
छुपी युती होणार?
राज्यात आगामी काळात मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, मालेगाव या महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका आहेत. इतर ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपमध्ये युती झाली नाही तरीही, फक्त मुंबईपुरती युती होणार का, याची चर्चा सुरू आहे. कारण या ठिकाणी मनसे किंगमेकर ठरू शकते. दुसरीकडे युती न होता दोन्ही पक्षात फक्त मुंबईचे महत्त्व पाहता तरी छुपी युती होणार का, याचीही चर्चा सुरूय. मात्र, त्यावर अजून तरी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. मग ही भेट नेमकी कशासाठी होती, याच्या चर्चा रंगत आहेत.
पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला
‘राष्ट्रवादी’कडून इच्छुकांची चाचपणी; नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात
शिवजयंतीच्या मुहूर्तावर केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे उद्घाटन; नाशिकमधून परदेशात होणार निर्यात