मुंबई | 09 ऑगस्ट 2023 : फुले साहित्याचे अभ्यासक, विचारवंत, समता परिषदेचे उपाध्यक्ष हरी रामचंद्र नरके यांचं निधन झालं आहे. मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हरी नरके यांच्या निधनाने समता चळवळीचा आघाडीचा शिलेदार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. डाव्या चळवळीशी नरके यांचा नजिकचा संबंध राहिला. फुले साहित्याचा अभ्यासक हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यांनी 56 पुस्तकांचं लेखन आणि संपादन केलं आहे.
मराठीतील एक प्रसिद्ध लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि त्याचबरोबर मराठी ब्लॉगर अशी हरी नरके यांची ओळख राहिली. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक राहिले. ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार, त्यांचं कार्य सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोवण्यात हरी नरके यांचा मोठा वाटा राहिला.
सध्याच्या काळात फेसबुकवर लिहिण्याचा ओघ वाढला आहे. अशात या आधुनिक प्लॅटफॉर्मवरही हरी नरके लिहिते झाले. त्यांचे ब्लॉग आणि फेसबुकवरील लिखान म्हणजे तरूणांसाठीचं ‘ऑनलाईन’ विद्यापीठ होतं. आता या विद्यापीठातील ज्ञानाचा वाहता झरा थांबल्याची भावना तरुणाई व्यक्त करत आहे.
याच आठवड्यात हरी नरके यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होतं. मात्र त्या आधीच त्यांची प्राण ज्योत मालवल्याने पुण्यातील साहित्य आणि डाव्या चळवळींच्या वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
एक ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपण गमावलं, असं म्हणत शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर प्रो. हरी रामचंद्र नरके यांचे दुःखद निधन झाले. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यापनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. त्यांच्या निधनाने एक ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपण गमावले.
हरी नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष होते. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू या प्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले.
हरी नरके यांच्या विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे विषय ज्वलंत उदाहरणे आहेत. जसे, ओबीसींमध्ये पेरली दुहीची बीजे, फॅसिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन, मराठा आरक्षण, महात्मा फुले, समाजशोध इत्यादी. त्याप्रमाणेच त्यांची पुस्तके, महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन, महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा असे अनेक पुस्तके प्रकाशित झाली.
मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर प्रो. हरी रामचंद्र नरके यांचे दुःखद निधन झाले. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यापनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. त्यांच्या निधनाने एक ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपण गमावले.
हरी नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय… pic.twitter.com/hlyv43Gw64
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 9, 2023
राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट करत हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
ज्येष्ठ विचारवंत, माझे मार्गदर्शक प्रा. हरी नरके सरांच्या निधनाची बातमी धक्कादायक व वेदनादायी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच आई-जगदंबेचरणी प्रार्थना!
त्यांच्या निधनाने क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या विचारांचा गाढा अभ्यास असणारे सामाजिक व पुरोगामी चळवळीतील एक उमदं व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
ज्येष्ठ विचारवंत, माझे मार्गदर्शक प्रा. हरी नरके सरांच्या निधनाची बातमी धक्कादायक व वेदनादायी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच आई-जगदंबेचरणी प्रार्थना!
त्यांच्या निधनाने क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या विचारांचा गाढा अभ्यास असणारे… pic.twitter.com/gQEfvccCZI
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) August 9, 2023
आमदार रोहित पवार यांनीही हरी नरके यांना आदरांजली अर्पण केली आहे.
ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो व नरके कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

ओम शांती! ? pic.twitter.com/1c1Wqotuhm
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 9, 2023