मुंबई | 22 जानेवारी 2024 : मुंबईमध्ये काल, रविवारी टाटा मॅरेथॉन पार पडली. दरवर्षी प्रमाणे या यावर्षीही मुंबई टाटा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मात्र या मॅरेथॉन स्पर्धेत एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. या स्पर्धेत भाग घेतलेल्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची दुर्दैव घटना घडली. 74 वर्षीय राजेंद्र चंदमल बोरा हे मॅरेथॉनमध्ये धावत असतानाच अचानक खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. तर आणखी एक स्पर्धक सुवरदीप (वय 45) हेही मॅरेथॉनमध्ये धावातना खाली कोसळले. त्यांना मृत घोषित करण्यात आलं. मात्र त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या प्रकरणी आजाद मैदान पोलिसात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
देश विदेशातील हजारो नागरिकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी नोंदवला. माहीम रेती बंदर इथून हॉफ मॅरेथॉनला सुरवात झाली. माहीम-वरळी सीलिंक -हाजी आली करत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं ही मॅरेथॉन संपली. एकूण 21 किलोमीटरची ही रन होती. त्यासाठी आता हजारो स्पर्धेकांनी सहभाग नोंदवला. यात सहभागी झालेल्यांनी 10 किलोमीटर अंतर धावत पार केलं. टाटा मुंबई मॅरेथॉनचं यंदाचं हे 19 वं वर्षं होतं.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी असलेल्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. तर या स्पर्धेत भाग घेतलेल्या 22 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले आहे. टाटा मुंबई मॅरेथॉनचे १९ वे वार्षिक आयोजन मुंबईत रविवारी करण्यात आले होते. यात हजारो स्पर्धकांनी भाग घेतला होता. या मॅरेथॉनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीएसटी येथे हिरवा झेंडा दाखवला होता. मात्र यातील दोन स्पर्धक, सुवरदीप बॅनर्जी (वय 45) आणि राजेंद्र बोरा (वय 74) यांचा २१ जानेवारी २०२४ रोजी दुर्दैवी मृत्यू झाला.
Maharashtra | A 75-year-old man who participated in the Mumbai Marathon died of a heart attack today. The deceased has been identified as Rajendra Chandmal Bora. Mumbai’s Azad Maidan Police has registered a case under ADR and started further investigation: Mumbai Police
A…
— ANI (@ANI) January 21, 2024