मुंबई : राजकीय नेतेमंडळी रोज एकमेकांवर टीकेची झोड उडवताना दिसून येतात. मात्र हीच मंडळी काही ठिकाणी एकत्रही येतात. पुण्यात अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील एका लग्ननात एकत्र येत चर्चा झाली. ही बातमी ताजी असताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकांना (Mayor Kishori Pednekar) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लिफ्ट दिल्याची माहिती समोर आली आहे. गोव्यात सध्या निवडणुकांचा धुरळा (Goa Elections 2022) उडतोय. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक नेतेमंडळी गोव्याच्या प्रचारात उतरले आहेत. शिवसेना आणि भाजप पूर्ण जोर लाऊन लढत आहे. देवेंद्र फडणवीसही गोव्याचे प्रभारी असल्याने गोव्यातच होते. तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरही गोव्यात शिवसेनेच्या प्रचाराला गेल्या होत्या. गोव्यात प्रचार जरी एकमेकांविरोत करत असले तरी सकाळी दोघं एकाच विमानाने मुंबईला आले आहेत. फडणवीसांच्या विमानात महापौरांना लिफ्ट मिळाली आहे.
महापौरांना फडणवीसांची लिफ्ट
महापौर गोव्याच्या प्रचारात असतानाच अचनाक लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी आली. मुंबईच्या पहिल्या नागरिक असणाऱ्या महापौर पेडणेकर यांना पणजी येथून मुंबईकडे सकाळी फ्लाईट मिळत नव्हती. त्यानंतर फडवणीस यांच्याशी महापौर पेडणेकर यांनी संपर्क करत गोवातून येणाऱ्या चार्टरमध्ये लिफ्ट घेतली. फडवणीस, गोवा सीएम प्रमोद सावंत अणि गिरीश महाजन हे चार्टर प्लेनने गोव्यातून मुंबईला आले. याच विमानातून महापौर पेडणेकर यांना मुंबईत आणण्यात आले. फडणवीस आणि महापौर यांच्यातील राजकीय वाद, तसेच महापौर यांनी अमृता फडणवीस यांच्यावर केलेली टीका. शिवेसना आणि भाजपा उडत असलेले दररोज खटके अशातच नाजूक प्रसंगात महापौर आणि फडवणीस यांचा राजकीय प्रवास चर्चेचा विषय झालाय.
मोदी-आदित्य ठाकरे भेटही चर्चेत
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लता मंगेशकर यांच्या जाण्यानं मोठा धक्का बसला. सकाळीच त्यांनी लता मंगेशकरांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं. इतकंच काय तर यानंतर काही वेळानं ते मुंबई लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी येणार आहेत, असंही त्यांनी स्वतः आपल्या अधिकृत ट्वीटर हॅन्डलवरुन स्पष्ट केलं. तेव्हा त्यांच्या आगमनावेळी राजशिष्टाचार आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हेही तेव्हा उपस्थित होते. तसंच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही यावेळी मोदींनी रिसीव्ह करण्यासाठी हजर होते. याच वेळचा एक फोटोदेखील समोर आला आहे. या फोटोमध्ये नरेंद्र मोदी यांचं औपचारीक स्वागत केल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या सोबत मोदींनी चर्चा केली. काही काळ ते थांबले. आदित्य ठाकरेंशी बोलले. यावेळी नेमकी काय चर्चा झाली? याबाबत राजकीय तर्कवितर्क लढवले गेले नसते, तरच नवल! हळव्या प्रसंगातल्या या भेटी चर्चेत आहेत.