आता दुकानदारांनी ठरवावं दुकानांचे बोर्ड बदलण्याची किंमत जास्त की काचांची?; मनसेचा कडक इशारा

| Updated on: Dec 02, 2023 | 1:08 PM

MNS Leader Sandip Deshpande about Marathi Bord on Shops : मनसे आक्रमक; दुकानांवर मराठी पाट्या लावा अन्यथा...; दुकानमालकांना थेट इशारा. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनाही आवाहन केलं आहे. देशपांडे नेमकं काय म्हणाले? वाचा...

आता दुकानदारांनी ठरवावं दुकानांचे बोर्ड बदलण्याची किंमत जास्त की काचांची?; मनसेचा कडक इशारा
Follow us on

सुनील जाधव, प्रतिनिधी -टीव्ही 9 मराठी, मुंबई | 02 डिसेंबर 2023 : दुकानांवरच्या इंग्रजी पाट्या हटवून मराठी पाट्या लावाव्यात यासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ठिकठिकाणी मनसैनिक रस्त्यावर उतरत दुकनांची तोडफोड करत आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी इंग्रजी भाषेत पाट्या लावणाऱ्या दुकान मालकांना इशारा दिला आहे. आमच्यावर गुन्हे दाखल करण्याऐवजी त्या इंग्रजी पाट्या लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा. त्यांच्यावर धातूर मातूर फाईन माराची कारवाई करता. हे लोक त्यांच्या दुकानांच्या पाट्या मराठीत करत नसतील. तर त्यांच्या पाट्या बुलडोझरने उखडून टाका. बुलडोझर उत्तर प्रदेशमध्येच चालला पाहिजे, असं नाही महाराष्ट्रात ही चालू शकतो. सरकार ते का चालवत नाही, असा सवाल संदीप देशपांडे यांनी घेतली आहे.

आता तुम्ही ठरवा…

मनसे मराठी पाटीसाठी कंट्रोल करणार नाही. दुकान चालकाने ठरवा बोर्ड महाग का काचा महाग… बोर्ड बदलेनाही काचा फुटल्या त्याची जवाबदारी आमची नाही, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे. रोज दंड लावा. बुलडोझरने बोर्ड काढा. लगेच त्यांचे बोर्ड मराठीत होतील. सरकारची दहशत बसेल, अशी कारवाई पाहिजे. जर त्यांना असं करता येत नसेल. तर मनसे ते करेल. तर तेव्हा मग आमच्यावर गुन्हे दाखल करू नका, असं आवाहनही देशपांडे यांनी केलं आहे.

“मग आमच्यावर गुन्हे दाखल करू नका”

मनसे मराठी पाटीसाठी कंट्रोल करणार नाही. दुकान चालकाने ठरवा बोर्ड माहाग का काचा महाग… बोर्ड बदलेनाही काचा फुटल्या त्याची जवाबदारी आमची नाही, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे. रोज दंड लावा. बुलडोझरने बोर्ड काढा. लगेच त्यांचे बोर्ड मराठीत होतील. सरकारची दहशत बसेल, अशी कारवाई पाहिजे. जर त्यांना असं करता येत नसेल. तर मनसे ते करेल. तर तेव्हा मग आमच्यावर गुन्हे दाखल करू नका, असं आवाहनही देशपांडे यांनी केलं आहे.

महाराष्ट्र हा कायदा प्रेमी राष्ट्र इथे कायद्याचं पालन करत नसेल तर कसं करून घ्यायचं, हे मनसेला माहिती आहे. आम्ही वाट बघतोय सरकारने कारवाई करावी त्यांनी केली नाहीतर आमच्या पद्धतीने कारवाई होईल. नंतर आम्हाला दोष देऊ नये. मुख्यमंत्र्यांना नियम माहिती दोन्ही उपमुख्यमंत्री हुशार आहेत. त्यांना आम्ही कायदे काय शिकवणार त्यांना कायदे माहिती आहेत. त्यांनी कारवाई करावी, असंही देशपांडे म्हणाले.