Uddhav Thackrey : महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे एकला चलो रे? शिवसैनिकांचा स्वबळाचा नारा, ‘तो’ अहवाल महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवणार

| Updated on: Jan 09, 2025 | 10:10 AM

विधानसभा निवडणुकीनंतर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसशी युती न करता स्वबळावर निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी याबाबत विविध बैठका घेतल्या असून, प्रत्येक शाखेचा आढावा घेत आहेत. अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackrey : महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे एकला चलो रे? शिवसैनिकांचा स्वबळाचा नारा, तो अहवाल महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवणार
Follow us on

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता महायुतीच सरकार स्थापन झालंय. मंत्रीमंडळ विस्तारही झाला. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला. मात्र आता या निवडणुकीनंतर राज्यातील सर्व पक्षांना आगामी मुंबई महापालिका निवडणुकांचे वेध लागले असून सर्वांचा त्यावरच फोकस आहे. महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याअगोदरच ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. या निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी कंबर कसून तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि पराभव मनावर न घेता आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाही महापालिका निवडणुकीसाठी सज्ज झाला असून संपूर्ण तयारीने मैदानात उतरताना दिसत आहे. याचदरम्यान, आता काँग्रेसचा हात सोडून आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची शिवसैनिकांची मागणी होत असल्याची माहिती समोर येत आहे.

शिवसैनिकांचा स्वबळाचा नारा ?

मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेससह नव्हे तर शिवसेनेने स्वबळावरच ही निवडणूक लढवावी अशी शिवसैनिकांची मागणी आहे, असा अहवाल उद्धवसेनेच्या पक्ष निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांकडून घेतला आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, विधानसभा संघटक यांच्यासोबत बैठक घेऊन संघटनात्मक आढावा घेतला आहे. या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा सूर उमटवला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या महिन्यात, 26 व 27 डिसेंबर रोजी उद्धव ठाकरेंनी मातोश्री येथे मुंबईतील 16 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला होता. तर त्यानंतरही त्यांनी 14 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. एवढंच नव्हे तर ते आज ( गुरूवार 9 जानेवारी) दक्षिण मुंबईतील 6 विधानसभा मतदारसंघांचाही आढावा घेणार आहेत. आतापर्यंत झालेल्या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी कोणासोबतही युती किंवा आघाडी न करता उद्धवसेनेने स्वबळावर निवडणुका लढवाव्यात, असे मत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत जागा वाटपावरून मतभेद तीव्र झाले होते. शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात तणाव वाढला होता. तेच लक्षात घेता आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेने स्वबळावर ही निवडणूक लढवावी असे मत अनेक शिवसैनिकांचे असल्याचे समोर येत आहे.

विधानसभा निवडणूकीच्या निकाल लागल्यानंतर मुंबईत विधानसभा निहाय निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती त्यांनी वार्डनिहाय शाखाप्रमुख ते विभागप्रमुखांशी बातचीत केली होती . त्यानंतर या निरीक्षकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे 21 डिसेंबरच्या बैठकीत अहवाल सादर केला होता. त्यानंतर 26 डिसेंबर, 27,28 आणि 29 डिसेंबर पर्यत उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. तर आज ( 9 जानेवारी) उद्धव ठाकरे दक्षिण मुंबईतील 6 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतील.

अनेकांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची मागणी केली असली तरी अंतिम निर्णय हा उद्धव ठाकरेंवर आहे. उद्धवसेनेच्या अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी यांच्यासोबत ते बैठक घेणार आहेत. मुंबईतील प्रत्येक शाखेला ते भेट देणार असून त्याचे नियोजन करण्यात येत आहे, असे समजते.