मुंबई : पुणे शहरातील भाजप नेते रवींद्र साळगावकर यांनी खडकी पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात तक्रार दिpuneNCPली आहे. अजित पवार यांच्याकडून माझ्या जीवाला धोका असल्याचे रवींद्र साळगावकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटलं आहे. याशिवाय अजित पवार यांच्यावर गंभीर आरोपही केले आहे. त्यावर अजित पवार यांनी मुंबईत असताना प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये अजित पवार म्हणाले की, कोणामुळे कोणाच्या जीवाला धोका असेल तर त्याला संरक्षण मिळालं पाहिजे. ज्यांनी तक्रार केली त्याला पोलिसांनी आणि सरकारने संरक्षण दिले पाहिजे. जर त्याच्यात गंभीरता असेल तर त्याला स्टेनगन सहित सुरक्षा द्यावी. अजित पवार यांनी पुण्यातील तक्रारीवर ही प्रतिक्रिया दिली आहे.
याशिवाय अजित पवार म्हणाले तुम्ही मला इतक्या दिवसापासून ओळखता मी कायदा सुव्यवस्था, संविधान पाळणारा माणूस आहे. माझ्या कडून धोका असण्याचे काहीही कारण नाही, राजकीय धोका असू शकतो पण फिजीकल धोका असू शकत नाही.
खरंतर अजित पवार यांनी तक्रारदार असलेले रवींद्र साळगावकर यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत आपल्या लेटरहेडवर ही तक्रार दिली आहे. यामध्ये खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नसला तरी तक्रार पोलिसांनी घेतलेली आहे.
भाजपचे शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र साळगावकर यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अजित पवार यांच्याकडून जीवाला धोका असल्याचा तक्रारीत उल्लेख केला होता.
गणेश खिंड परिसरातील मोकळ्या प्लॉट संदर्भात मोजणी न करण्याचे न्यायालयाचे आदेश असतानाही मोजणी केली जात होती. त्या प्लॉटचा ताबा साळगावकर यांच्याकडे असल्याने त्यांना सतत धमकी येत आहे. म्हणून तक्रार दिल्याचा दावा रवींद्र साळगावकर यांनी केला आहे.
बिल्डर, तहसीलदार आणि अजित पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी रवींद्र साळगावकर यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे. मी तहसील कार्यालयात गेल्यावर त्या फाईल वरती अजित पवार नाव असलेली चिठ्ठी दिसली होती असाही आरोप साळगावकर यांनी केला होता.
मला कुठलीही धमकी आली नाही. मात्र अजित पवार आणि इतर दोन व्यक्तींकडून माझ्या जीवाला धोका आहे. अजित पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून घ्यावा माझी पोलिसांकडे विनंती आहे असेही रवींद्र साळगावकर यांनी म्हंटलं आहे.dnyaneshwari