मुंबई : निवडणूक आयोगाचा निकाल, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द आणि त्याच बरोबर तापस यंत्रणाच्या माध्यमातून होणारी कारवाई असे विविध मुद्दे हाती आलेले असल्याने विरोधी पक्षांनी म्हणजेच महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्रभर राण पेटवलं जाणार आहे. आधीच उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्रभर सभा सुरू आहेत. त्यात कोकण विभागाची खेड आणि उत्तर महाराष्ट्राची मालेगाव येथे नुकतीच सभा पार पडली आहे. त्यात आता महाविकास आघाडी एकत्रित सभा घेऊन सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर या सभांना आणि पेटवलेले रान क्षमविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर सभा घेणार आहे. त्यासाठी धनुष्यबाण यात्रा काढली जाणार आहे.
महाविकास आघाडीच्या जिथे जिथे सभा होणार आहे तिथे तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धनुष्यबाण यात्रा काढली जाणार असून जाहीर सभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहे. त्यामुळे राजकीय पाठशिवणीचा खेळ रंगणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
शिवसेना पक्षाकडून याबाबत नियोजनाच्या हालचाली सुरू झाल्या आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ही धनुष्यबाण यात्रा काढली जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काही दिवसांवर अयोध्या दौरा येऊन ठेपलेला आहे. तो दौरा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लगेचच धनुष्यबाण यात्रा सुरू होणार आहे. जिथे महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे तिथे 8 एप्रिल पासून ही यात्रा सुरू होणार आहे.
महाविकास आघाडीच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना पक्ष रणनीती आखत आहे. त्यामध्ये मराठवाड्यातील काही नेत्यांचे प्रवेश होणर असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेकडून धक्का तंत्राचा वापर केला जाणार असल्याचे या तयारीवरुण दिसून येत आहे.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या आहेत. त्याच मैदानावर एकनाथ शिंदे यांची धनुष्यबाण यात्रा सुरू होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ऐतिहासिक मैदानावर होणारी सभा संपूर्ण ताकदीने करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
महाविकास आघाडीच्या पहिला सभेचा टीझरही रिलीज झाला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची सभा होणार असून जोरदार तयारी केली जात आहे. महाविकास आघाडीचे नेते याबाबत तयारी करत असून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शक्तीप्रदर्शन यानिमित्ताने करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.