‘आय किल्ड बापू’ चित्रपटाविरोधात एफआयआर नोंदवण्याची काँग्रेसची मागणी

| Updated on: Oct 11, 2023 | 11:16 AM

काँग्रेसचे प्रवक्ते भरत सिंह यांनी 'आय किल्ड बापू' या चित्रपटाविरोधात तक्रार दाखल करत एफआयआर नोंदवण्याची मागणी केली.भरत सिंह यांनी विलेपार्ले पूर्व पोलीस ठाण्यात चित्रपटाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

आय किल्ड बापू चित्रपटाविरोधात एफआयआर नोंदवण्याची काँग्रेसची मागणी
Follow us on

मुंबई | 11 ऑक्टोबर 2023 : ‘आय किल्ड बापू’ या चित्रटावरून सुरू झालेला वाद संपण्याची काहीच चिन्हे दिसत नाहीत. आता काँग्रेसचे (congress demands ban ) प्रवक्ते भरत सिंह यांनी या चित्रपटाविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. या चित्रपटाविरोधात भरत सिंह यांनी मुंबईतील विलेपार्ले पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रतिमा डागाळणाऱ्यांविरोधात एफआयआर नोंदवण्याची विनंती आहे, असे काँग्रेस प्रवक्त्याने या तक्रारीत नमूद केले आहे. हा चित्रपट २९ सप्टेंबर रोजी झी5 ओटीटी वर रिलीज झाल्यानंतर नवा वाद सुरू झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर भरत सिंह यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करत एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.

गोडसे यांना नायक म्हणून दाखवण्यात येत आहे.

” महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याने गांधींच्या हत्येमागील कारण स्पष्ट करणाऱ्या विशेष न्यायालयात दिलेल्या वक्तव्यावर हा चित्रपट आधारित आहे. महात्मा गांधींच्या हत्येप्रकरणी नथुराम गोडसेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या चित्रपटात महात्मा गांधींची हत्या करणाऱ्याला नायक म्हणून चित्रीत करण्यात आले आहे. हे स्वीकार करता येण्यासारखे नाही. गांधीजी आणि त्यांच्या अहिंसेच्या विचारसरणीतून देशाची प्रतिमा ओळखली जाते. त्यामुळे आम्ही या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा निषेध करतो आणि त्यावर बंदी घालण्याची मागणी करतो ” असे त्यांनी म्हटले आहे.

प्रोड्यूसर, डायरेक्टर आणि अभिनेत्यांवर व्हावी एफआयआर दाखल

मुंबईतील विलेपार्ले पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सिंह यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेत्यांचे नावही नमूद केले आहे. ‘आय किल्ड बापू’ या चित्रपटाचे निर्माते विकास प्रॉडक्शनच्या सरला अशोक सरावगी आणि राहुल शर्मा, दिग्दर्शक हैदर काझमी, चित्रपटात काम करणारे कलाकार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात यावी, असे त्यांनी नमूद केले आहे.