पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे यांना हायकोर्टाकडून दिलासा, जुगार प्रकरणाचा गुन्हा रद्द

| Updated on: Apr 30, 2024 | 5:03 PM

पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पीएसआय खरमाटे यांच्यावर दाखल असलेला जुगार प्रतिबंधक कायद्याचा गुन्हा हायकोर्टाने केला रद्द केल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. 2019 विश्वचषकाचे सामने सुरू होते. तेव्हा खरमाटे हे माटुंगा पोलीस ठाण्यात कर्तव्यास होते, त्यावेळीच पीएसआय खरमाटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र खरमाटे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आणि हा खटला आपल्याविरुद्ध रचण्यात आल्याचा आरोप केला.

पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे यांना हायकोर्टाकडून दिलासा, जुगार प्रकरणाचा गुन्हा रद्द
Follow us on

पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पीएसआय खरमाटे यांच्यावर दाखल असलेला जुगार प्रतिबंधक कायद्याचा गुन्हा हायकोर्टाने केला रद्द केल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. 2019 विश्वचषकाचे सामने सुरू होते. तेव्हा खरमाटे हे माटुंगा पोलीस ठाण्यात कर्तव्यास होते, त्यावेळीच पीएसआय खरमाटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र खरमाटे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आणि हा खटला आपल्याविरुद्ध रचण्यात आल्याचा आरोप केला.

वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सामन्यादरम्यान कथित स्वरूपात बेटिंग सुरू होते. एका हॉटेलमध्ये जुगार खेळत असल्याचा ठपका पीएसआय खरमाटे यांच्यावर ठेवण्यात आला होता. पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकून आरोपींना रंगेहाथ पकडलं. मात्र आता तब्बल 5 वर्षांनी या प्रकरणी ज्ञानेश्वर खरमाटे यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. हायकोर्टाने माटुंगा पोलीस ठाण्यातील मूळ एफआयआर रद्द करुन ही याचिका निकाली काढली आहे.

खरमाटे यांना या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलेल्या याचिकेत करण्यात आला होता. हायकोर्टाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकले. त्यानंतर मुंबई हायकोर्टाने 2019 मध्ये माटुंगा पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर रद्द केला. त्या एफआयआरमध्ये पीएसआय खरमाटे यांच्या क्रिकेट बेटिंगमध्ये कथित सहभागाबद्दल जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोर्टाने त्यांच्यावरील गुन्हा रद्द करण्याचा आदेश काढला. पाच वर्षांनी त्यांच्यावरील गुन्हा रद्द करण्यात आल्याने खरमाटे यांना दिलासा मिळाला आहे.

मिकीन शाह नावाचा व्यक्ती ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड या सामन्यावर फोनवरुन बेटिंग लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी सूत्र हलवली आणि पथकाने दादरमधील हॉटेलवर धाड टाकली. यात दोन जण सट्टा खेळताना दिसून आले. या कारवाईत क्रिकेट बुकी मिकीन शाह आणि त्याचे दोन साथीदार मनीष सिंग आणि प्रकाश बनकर हे सट्टा लावत होते. मात्र आता याप्रकरणी न्यायालयाने पोलीस ठाण्यातील मूळ एफआयआर रद्द करुन ही याचिका निकाली काढल्याने खरमाटे यांना दिलासा मिळाला.