शीतल म्हात्रे Video चा मास्टरमाइंड कलानगरात, नितेश राणेंचा मोठा दावा!

| Updated on: Mar 13, 2023 | 5:45 PM

शीतल म्हात्रे यांचे व्हायरल व्हिडिओ प्रकरण चांगलेच तापले आहेत. त्यावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबावर जोरदार निशाणा साधत हल्लाबोल केला आहे.

शीतल म्हात्रे Video चा मास्टरमाइंड कलानगरात, नितेश राणेंचा मोठा दावा!
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : सध्या शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओवरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून एसआयटीच्या माध्यमातून तपास केला जाणार आहे. यामध्ये ज्या संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे ते शिवसेना ठाकरे गटाचे असल्याचे बोलले जात आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याचीही चर्चा आहे. त्याच दरम्यान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे. यामध्ये शीतल म्हात्रे ( Sheetal Mhatre ) यांची बदनामी करणारा मास्टर माइंड हा कलानगर येथे बसला असून मातोश्रीत असल्याचे मोठा दावा केला आहे. इतकेच काय आम्हालाही व्हिडिओ मॉर्फ करता येतील असा इशारा राणे यांनी दिला आहे.

शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये शीतल म्हात्रे यांचा तो व्हिडिओ मॉर्फ केल्याचा दावा केला जात असून बदनामी केली जात असल्याचे म्हंटले आहे. या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही पडल्याचे पाहायला मिळाले आहे.

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी त्यांची बदनामी होत असल्याने शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत आक्रमक होत चौकशीची मागणी केली होती. त्यावरून सभागृहात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यानुसार एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

आयपीएस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी केली जाणार असून आत्तापर्यन्त चार जणांना अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणावरून आमदार नितेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल करत ठाकरे कुटुंबावर निशाणा साधला आहे.

नितेश राणे म्हणाले, शितल म्हात्रे यांच्या व्हीडीओ बाबत आज चर्चा झाली आहे, मॉर्फ केलेला व्हीडीओ बाबात काही नावे समोर आली आहे. मातोश्री नावच्या पेज वरून व्हीडीओ पोस्ट झाले आहे. युवासेनेचे २ कार्यकर्त्यांने हे केले आहे त्यांच्या मागे मास्टरमाईड आहे आणि तो मास्टरमाइंड कलानगर मध्ये आहे.

यांच्या सोबत जे आहे ते चांगले आणि सोडून गेले ते वाईट आहेत, जर खरच मर्दानगी असेल तर समोर येऊन बोल, तुम्ही जर हा मॉर्फचा खेळ सुरू केला तर आम्ही पण करू, पार्टीचे अनेक व्हीडीओ आहेत, आम्ही पण व्हायरल करून म्हणत कलानगरमध्ये बसुन बदनामी सुरू असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहीजे, शीतल म्हात्रे यांची बदनामी झाली त्याचा हिशोब द्यावा लागेल, डिनो मोरिया सोबतचे देखील मोर्फ फोटो करू. आमच्याकडे देखील चांगले ग्राफिक्स डिझायनर आहेत, म्हात्रे नाव घेत नसतील पण मी घेतोय तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना मी सहकार्य करेल असेही नितेश राणे यांनी म्हंटलं आहे.