मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर संपूर्णं महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यामध्ये शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यामध्ये काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वतःच्या रक्ताने शरद पवार यांना पत्र लिहून राजीनामा मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये सुप्रिया सुळे येताच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यावेळी सुप्रिया सुळे हात जोडून विनंती करत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.
खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या बाबत घेतलेला निर्णय मागे घ्यावा. शरद पवार हेच अध्यक्ष हवेत म्हणून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रक्ताने पत्र लिहून शरद पवार यांच्याकडे विनंती केली आहे.
शरद पवार यांनी राजीनामा दिला आहे तो मागे घ्यावा अशी मागणी करत काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते वाय बी चव्हाण सेंटरच्या बाहेर उपोषण करत आहे. त्यांना विनंती करण्यासाठी सुप्रिया सुळे आल्या होत्या. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी विनंती करून पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्याशी पाच जण चर्चेला चला म्हणून सांगितले होते. मात्र, आता चर्चा नको साहेबच आम्हाला अध्यक्ष म्हणून हवे आहेत असा हट्ट करत सुप्रिया सुळे यांनाच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे पदाधिकारी आपल्या मागणीवर ठाम असल्याने सुप्रिया सुळे यांनी तिथून काढता पाय घेतला.
वाय बी चव्हाण सेंटरच्या बाहेर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. सुप्रिया सुळे यांनीही मनधरणी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे न ऐकता आम्ही आमच्या मागणीवर ठाम असल्याचे सांगत सक्षणा सलगर, मेहबूब शेख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेलती होती.
शरद पवार यांनी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे. त्यामध्ये उद्या सकाळी बैठक होणार आहे. तो पर्यन्त वाट बघू नाहीतर पुन्हा तुम्ही बसा असं सांगत सुप्रिया सुळे यांनी उपोषण कर्त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्याच वेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शरद पवारच अध्यक्ष हवेत म्हणून आग्रह कायम ठेवला आहे.