मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये एक वादग्रस्त विधान केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी बोलत असतांना संजय राऊत यांनी चाटूगिरी करत असल्याचा आरोप केला होता. त्यावरून शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी योगेश बेलदार यांनी बदनामी केल्याच्यासंदर्भात पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर लोकनेते एकनाथ संभाजी शिंदे फाउंडेशनच्या वतीने संजय राऊत यांच्यावर बदनामी प्रकरणी मानहानीची याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असतांना संजय राऊत यांनी पुन्हा हल्लाबोल केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर मानहानीच्या संदर्भात लोकनेते एकनाथ संभाजी शिंदे फाउंडेशनच्या वतीने याचिका दाखल केली जात असतांना अडचणीत वाढ होण्याची शक्यता असतांना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत म्हणाले, चाटूगिरी ही राजकारणातील संज्ञा आहे, एक वाक्प्रचार आहे. आणि मी काय खोटं बोललो? असा उलट सवाल करत राजकारणात चाटूगिरीच सुरू आहे. चाटूगिरी करूनच तर सरकार आले आहे. असं म्हणत संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
खरंतर काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना दिल्ली उच्च न्यायालयाने एक समन्स बजावले आहे. यामध्ये संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया देत असतांना कोर्टात आम्ही आमची बाजू मांडू म्हणत अधिकचे बोलणे टाळले होते.
पन्नास खोके एकदम ओके, गद्दार यांसह एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. राज्यात सत्तांतर केले जात असतांना शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल केला गेला होता. यावरून राहुल शेवाळे यांनी याचिका दाखल केली होती.
दिल्ली उच्च न्यायालयात याबाबत संजय राऊत यांच्यासह ठाकरे पिता-पुत्र देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली होती. त्यावरून आता पुन्हा एकदा चाटूगिरी म्हंटल्याच्या आरोपा वरून संजय राऊतांच्या विरोधात प्रकरण न्यायालयात गेले आहे.
त्यानंतर संजय राऊत त्यांच्या बोलण्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. पुढील काळात याबबात काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. संजय राऊत यांच्यावर तसा पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यावरून अदखल पत्र गुन्हा दाखल आहे.