एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा, संजय राऊतांनी सांगितली जुनी आठवण, अयोध्या दौरा संकल्पना कुणाची?

| Updated on: Apr 08, 2023 | 11:54 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रविवारी आयोध्या दौरा पार पडत आहे. याच दौऱ्यावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा, संजय राऊतांनी सांगितली जुनी आठवण, अयोध्या दौरा संकल्पना कुणाची?
Image Credit source: TV9 Network
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी आयोध्य दौऱ्यावर जाणार आहेत. महाराष्ट्रातून अनेक शिवसैनिक हे अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. याच दरम्यान आयोध्या मध्ये जोरदार तयारी देखील केली जात आहे. याच काळात एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या दरम्यान भाजपकडून देखील बळ दिले जात आहे. याच संपूर्ण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना आयोध्याचा मार्ग आम्हीच दाखवला आहे असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे.

खरंतर शिवसेना एकसंघ असताना यापूर्वी अनेकदा अयोध्या दौरा पार पडला आहे. या दौऱ्यातही संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. उद्धव ठाकरे यांचा दोनदा आयोध्या दौरा, त्यानंतर आदित्य ठाकरे यांचा आयोध्या दौरा यांचे संपूर्ण नियोजन हे संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाने झाले आहे.

त्यावेळेला मंत्री असताना एकनाथ शिंदे यांना देखील निमंत्रण देण्यात आल्याचं संजय राऊत यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आयोध्याचा मार्ग दाखवणारे आम्हीच आहोत, म्हणत संजय राऊत यांनी शिंदेंना टोला लागला आहेत.

हे सुद्धा वाचा

राज्यासह देशांमध्ये ज्या वेळेला हिंदुत्वाचा मुद्दा समोर येत होता त्यावेळेला भाजपकडून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला जात होता. मात्र, शिवसेना फुटी नंतर पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा समोर आल्यानंतर आता शिवसेना म्हणजेच शिंदे यांच्याकडून आयोध्या दौरा केला जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी करत राज्यात सरकार स्थापन केले होते त्यानंतर भाजपकडून शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असा थेट आरोप करत अनेकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यालाच प्रत्युत्तर म्हणून अनेकदा अयोध्या दौरे पार पडले आहेत.

अयोध्या दौरा ही संपूर्ण संकल्पना संजय राऊत यांची असल्याचं स्वतः त्यांनी आज माध्यमांसमोर सांगितलं. उद्धव ठाकरेंना अयोध्येला घेऊन जाण्याची संकल्पना माझीच असल्याचं संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर रामाच्या चरणी लीन होऊन महाराष्ट्रात केलेले पाप पुसले जाणार नाही असा टोला ही शिंदे यांना संजय राऊत यांनी लगावला आहे.

आयोध्या हे तीर्थक्षेत्र आहे. तिथे कुणालाही जाण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. मात्र, तिथे जाऊन सत्याचा बोध घ्यावा असा टोलाही संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.