उपऱ्या लोकांचा वरवंटा आमच्यावर फिरवणार आहात का? मी काय करणार होतो, बारसू प्रकल्पावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं…

| Updated on: May 04, 2023 | 2:49 PM

बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडत असतांना सरकारवर गंभीर आरोप केला आहे. त्यावरून पुन्हा एकदा राजकारण तपण्याची शक्यता आहे.

उपऱ्या लोकांचा वरवंटा आमच्यावर फिरवणार आहात का? मी काय करणार होतो, बारसू प्रकल्पावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
Image Credit source: TV9 Network
Follow us on

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बारसू रिफायनरी प्रकल्पावर बाबत गंभीर आरोप केला आहे. कुठल्याही दबावाखाली तो निर्णय घेतला नव्हता असे स्पष्टीकरण दिले आहे. रत्नागिरी येथील बारसू येथे माती परीक्षण सुरू असतांना लोकांच्या डोक्याला बंदूक लावून परवानगी घेतली जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी तिथे जावून शेतकऱ्यांना भेटणार असल्याचे स्वतः उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे. त्यामध्ये कोणाची हिंमत बघायला जात नाहीये असाही टोला उद्धव ठाकरे यांनी सरकारला लगावला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले मी बारसू येथे जात असलो तरी मी काही कोणाची हिम्मत बघायला जात नाहीये, मी लोकांना तिथल्या शेतकऱ्यांना भेटायला जात आहे. मी मुख्यमंत्री असतांना तेव्हा केंद्रातून सांगण्यात आलं होतं की हा प्रकल्प चांगला आहे. मात्र, दबावाखाली याबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही असेही ठाकरे म्हणाले.

रिफायनरीमुळे होणारे प्रदूषण मान्य नाही, चांगले प्रकल्प गुजरातकडे गेले. प्रकल्प चांगला असेल तर लोकांसमोर सादरीकरण करा, लोकांच्या डोक्यावर बंदूक ठेवून परवानगी घेताय, कोणाच्या बाजू घेऊन घेताय. त्या जमिनी उपऱ्यांनी विकत घेतल्या आहेत असाही आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

मी माझ्या लोकांना भेटायला जातोय. मला अडवण्यापेक्षा लोकांना उत्तरं द्या. मी पत्र लिहलं कारण खर सांगतो मला खोटं बोलता येत नाही प्रकल्प येत असेल तर ठीक आहे. पण लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे असं म्हणणं होत, भूमिपुत्र आहेत त्यांना अधिकार मिळाले पाहिजेत अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे.

खरंतर गेल्या काही दिवसांपासून बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामध्ये अनेकांनी आंदोलन करत माती परीक्षण सर्वेला विरोध करण्यासाठी आंदोलन देखील केले आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी सरकारवर हल्लाबोल मांडलेल्या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे.

बारसू येथे प्रकल्प करत असतांना मी असतो तर शेतकऱ्यांना सादरीकरण दाखवले असते. त्यात त्यांना सादरीकरण पटले असते तरच प्रकल्प केला असता. एकतर अडचण दूर नाहीतर प्रकल्प दूर असं केलं असतं. असेही उद्धव ठाकरे यांनी सांगत बारसू येथील शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा दौरा नेमका कसा होतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.