मुंबई | 26 नोव्हेंबर 2023 : अंतरवली सराटीतील दगडफेकी प्रकरणी जालना पोलिसांनी ऋषिकेश बेद्रे आणि इतर दोन जणांना अटक केली आहे. या प्रकरणावर भाजप आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी अंतरवलीतील दगडफेकीतील आरोपी आणि शरद पवार यांचा फोटो शेअर केलाय. या फोटोच्या आधारे नितेश राणे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना थेट सवाल विचारला आहे. अंतरवलीतील आरोपी तुम्हाला भेटत असेल तर पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला?, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.
दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात?
अंतरवली सराटीतील दगडफेक करणारा मुख्य आरोपी हृषीकेश बदरेनी शरद पवार, राजेश टोपेंची भेट घेतली. १ सप्टेंबर पोलीसांवर दगडफेक तर ३ सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली.
पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय?
दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात?
अंतरवली सराटीतील दगडफेक करणारा मुख्य आरोपी हृषीकेश बदरेनी शरद पवार, राजेश टोपेंची भेट घेतली. १ सप्टेंबर पोलीसांवर दगडफेक तर ३ सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली.
पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण… pic.twitter.com/Nti9p7ortQ— nitesh rane (@NiteshNRane) November 26, 2023
भाजप आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एक फोटो शेअर केलाय. या फोटोत शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे दिसत आहेत. या दोघांसोबत अंतरवली सराटीतील दगडफेक प्रकरणातील आरोपी ऋषिकेश बेद्रे देखील दिसत आहे. यावरून नितेश राणे आक्रमक झाले आहेत. त्यांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला आहे. पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय?, असं म्हणत नितेश राणे यांनी शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
जालन्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु होतं. मनोज जरांगे पाटील यांच्यासह अन्य मराठा बांधव भगिनी तिथे उपस्थित होत्या. अशातच तिथे गोंधळ उडाला. आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. आंदोलक जखमी झाले. या सगळ्या प्रकरणावरून विरोधकांनी शिंदे सरकारला टार्गेट केलं. गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय पोलीस अशी कृती करणार नाहीत, असं म्हणत विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. या प्रकरणातील तीन आरोपींना अटक झाली आहे. मात्र नितेश राणे यांच्या ट्विटने लक्ष वेधलं आहे.