मुंबईः मुंबईत परळमध्ये गॅस पाइपलाइनला (Mumbai Gas leakage) गळती झाली आहे. पेट्रोल पंपाजवळच ही घटना घडली आहे. अग्निशमक दलाच्या (Fire Brigade) गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आजूबाजूची सर्व दुकाने तातडीने बंद करण्यात आली असून परिस्थिती आटोक्यात असल्याची माहिती समोर आली आहे. महानगर गॅस पाइपलाइनमध्ये ही गळती झाली आहे. गॅस पाइपलाइन भूमिगत असल्याने जमिनीतून गॅस, आग (Mumbai Paral Fire) आणि धूर निघत असल्याचे चित्र भयंकर होते. जमिनीतील पाइपलाइनचा माग घेत अग्निशमक दलाचे जवान त्यावर पाण्याचा फवारा मारत होते. मात्र एका ठिकाणी पाण्याचा मारा सुरु असताना दुसऱ्या ठिकाणाहून धूर निघत होता. त्यामुळे गॅसपाइपलाइनला नेमकी कुठे गळती झाली आहे, ही गळती थांबवता येईल का, हे आव्हान सध्या अग्निशमक दलासमोर आहे.
Maharashtra | Fire breaks out on BA Road, near a petrol pump, in Parel, Mumbai. Fire Brigade, Police and Ambulance present at the spot. Details awaited.
— ANI (@ANI) August 29, 2022
परळ परिसरातील आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. अग्निशामक दलाच्या प्रयत्नांनी आग विझवण्यात आली आहे. मात्र गॅस पाइपलाइन ही भूमिगत असल्यामुळे त्यात नेमकी कुठे गळती झाली आहे, याचा शोध लागलेला नाही. पाइप लाइनला कुठे बिघाड झालाय, हे शोधण्यासाठी तात्पुरता या भागातील गॅस पुरवठा बंद करण्यात आला आहे. महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत ही गळतीची ठिकाणं शोधली जात आहेत. त्यावर लवकरात लवकर दुरूस्ती करून गॅसपुरवठा पुन्हा एकदा सुरु केला जाईल.
ही बातमी अपडेट होत आहे…