मुंबई | 09 डिसेंबर 2023 : नवाब मलिक… ज्यांच्या भोवती महाराष्ट्रातील दोन मोठ्या पक्षांचं राजकारण सध्या फिरताना दिसतंय. नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला भाजपने कडाडून विरोध केला. उपमुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना खुलं पत्र लिहिलं. या पत्रातून नवाब मलिक यांच्यावर झालेले आरोप पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य नसल्याचं म्हटलं. या सगळ्याभोवती राज्यात राजकीय घमासान पाहायला मिळतंय. या सगळ्यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. एक फोटो शेअर केलाय. यात यात संजय राऊत यांनी या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
नवाब मलिक, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा एक फोटो संजय राऊत यांनी ट्विट केला आहे. यात प्रफुल्ल पटेल मलिकांना पेढा भरवताना दिसत आहेत. तिघेही स्मित हास्य करत असल्याचा हा फोटो राऊतांनी ट्विट केला आहे. तर ऐसी बात बोलिए, के कोई न बोले झूठ… और ऐसी जगह बैठिए, के कोई न बोले *उठ..!* , असं कॅप्शन देत राऊतांनी हा फोटो ट्विट केला आहे.
ऐसी बात बोलिए,
के कोई न बोले झूठ…
और ऐसी जगह बैठिए
के कोई न बोले *उठ..!* pic.twitter.com/AXdQzy8XGr— Sanjay Raut (@rautsanjay61) December 9, 2023
हिवाळी अधिवेशन सुरु झालं अधिवेशनाच्या त्या दिवशी विधिमंडळात नवाब मलिक हे अजित पवार गटाच्या बाजूला बसले. यावरून विरोधकांनी सरकारला घेरलं. आधी देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांवर आरोप केले तेच मलिक आत सरकारमध्ये सामील होणार का?, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. या सगळ्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहिलं. यात तुमच्या पक्षात कुणाला घ्यायचं, हा तुमचा अधिकार आहे. पण मलिकांवर गंभीर आरोप आहेत, असं असताना त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसं पत्र देवेंद्र फडणवीस यांना अजित पवारांना लिहिलं.
सत्ता येते आणि जाते.
पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा… pic.twitter.com/WDzm3Pjo3f— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 7, 2023
देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या या पत्रावर संजय राऊत यांनी भाष्य केलं. त्यांनी ट्विट करत यावर भाष्य केलं. अरे बापरे! सत्तेपेक्षा देश महत्वाचा अशी एकदम नवी माहिती देवेंद्रजी यांनी दिली. महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला हे माहीतच नव्हते.. त्यांच्या देशात हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल, सिंचन घोटाळा फेम अजित पवार, ED फेम भावना गवळी, सरनाईक, मुलुंडचे नागडे पोपटलाल यांना मानाचे स्थान आहे.. यांचा देश हा असा आहे! हल्ला फक्त मलिक यांच्यावर. बाकीचे यांच्या मांडीवर! पिते दूध डोळे मिटूनी… जात मांजराची…, असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला.
अरे बापरे!
सत्तेपेक्षा देश महत्वाचा अशी एकदम नवी माहिती देवेंद्रजी यांनी दिली.महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला हे माहीतच नव्हते..त्यांच्या देशात हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल,सिंचन घोटाळा फेम अजित पवार,ED फेम भावना गवळी,सरनाईक, मुलुंड चे नागडे पोपटलाल यांना मानाचे स्थान आहे..यांचा देश… https://t.co/nu03sidgmc— Sanjay Raut (@rautsanjay61) December 7, 2023