मुंबई | 26 नोव्हेंबर 2023 : 26/11… 2008 साली आजच्याच दिवशी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्लात निरापराध लोकांचे बळी गेले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. 26/11 हल्ल्यावर बोलताना त्यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. 26/11 ला झालेला हल्ला हा मुंबईचा नसून देशावरती झालेला हल्ला आहे. मुंबई विकलांग करण्यासाठी हे आंतरराष्ट्रीय कारस्थान होतं. मुंबई कमजोर करण्याचे प्रयत्न तेव्हा अतिरेकी पाकिस्तानी यांनी केलं. आता काही राजकीय लोकं करत आहे. त्यांच्या हातात फार तर बंदुका नसतील किंवा बॉम्ब नसतील. मात्र काहीही करून त्यांना मुंबई अस्थिर आणि विकलांग आणि कमजोर करून मुंबईचे महत्व कमी करायचा आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय.
हौतात्म्य पतकऱ्यांना अभिवादन करण्यासाठी आजचा दिवस आहे. अजून देखील शहीद आणि बलिदान होत आहे. मणिपूर अजून देखील हल्ले सुरू आहे जम्मूमध्ये देखील परिस्थिती बिकट आहे, असंही संंजय राऊत म्हणाले. आज शहीदांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. पण काश्मीरमध्ये जवानांची हत्या केली जातेय. संविधान कुर्तडून खाजगी संविधान लादण्याचा प्रयत्न होतोय. संविधान नसेल तर देश नसेल, असं संजय राऊत म्हणालेत.
मिझोराममध्ये भाजप जिंकणार नाही. मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड इथेही मोदींची जादू चालणार नाही. राजस्थान मध्ये अटीतटीची लढत पण तिकडे काँग्रेस मुसंडी मारेल. 2014 पासून काश्मिरी पंडित यांच्या मुद्द्यावर मत मागत आहेत. रामाचे दर्शन हा मुद्दा आचार संहितेचा भंग आहे. राज्यात लोकसभा निवडणूक निकालात 40 पेक्षा जास्त जागा इंडिया आघाडीकडे येतील. तर देशात 300 पेक्षा जास्त खासदार हे इंडिया आघाडीचे असतील, असं संजय राऊत म्हणालेत.
बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपल्याला संविधान मिळालं. गेल्या दहा वर्षांपासून या संविधानाचा खाजगीकरण सुरू आहे हे सत्य आहे. संविधान कमजोर करण्याचा प्रयत्न आहे संविधान कुडतडण्याचा प्रयत्न आहे संविधान कुडतडून त्याच्यात बदल करण्याचे काम खाजगी संविधान लादण्याचं काम या देशात सुरू आहे .संविधान वाचवण्याची जबाबदारी या देशाच्या प्रत्येक नागरिकांवरती आहे 2024 साली या देशाची राजकीय लढाई संविधान वाचवण्यासाठीच होईल. संविधान नसेल तर हा देश राहणार नाही. देशाच्या संविधानावरती हल्ले सुरु आहे ते आपण पडतळून लावले पाहिजे, असं म्हणत संविधान दिनावर संजय राऊत यांनी भाष्य केलं.