गणेश थोरात, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर आज सुनावणी होत आहे. या सुनावणीआधी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणत होते की, सरकार पडणार नाही. मला त्यांना विचारायचंय, सरकार पाडणं हे तुमचं काम आहे का? आकडा पाहिजे. मग हा आकडा तुम्ही लावू नका. जोपर्यंत तुमच्यासारखी माणसं सरकारच्या ताटाखालचं मांजर बनून त्या खुर्चीवर बसलेली आहे. तोपर्यंत सरकार कसं पडेल?, असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे.
राज्यातील सरकार बेकायदेशीर आहे. गैरकानूनी पद्धतीने हे सरकार चालत आहे. कोर्टाने जे निर्देश दिले आहेत. नार्वेकर यांना कोर्टाने निर्देश दिले आहेत. सांगितले आहे की, राजकीय भाषा कमी करा. तुम्ही ज्या खुर्चीवरती बसले आहेत. कायद्यानुसार सरकार बाबत तुम्ही वकालत करू शकत नाही, असं कोर्टाने नार्वेकरांना सुनावलं आहे. स्वार्थासाठी त्यांनी अनेक पक्ष बदलेत. त्यांच्यावरती काय विश्वास ठेवायचा? बेकायदेशीर सरकार वाचवण्यासाठी विधानसभा अध्यक्षपदावर ही त्याच विचाराची व्यक्ती बसलेली आहे. बेकायदेशीर सरकारला संरक्षण देत आहे, असं म्हणत संजय राऊतांनी घणाघात केला आहे.
तेलंगणामध्ये भाजप जिंकणार नाही. तेलंगणामध्ये लढाई काँग्रेस आणि केसियार मध्ये सुरू आहे बीजेपीच्या स्पर्धेत देखील नाही. महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पिकांचे नुकसान मात्र हे तेलंगामध्ये प्रचारामध्ये मग्न झाले आहेत. शेतकरी आक्रमक झालेले आहेत. पिकांचं नुकसान झालेलं आहे. तेलंगणामध्ये तुम्हाला कोण विचारतं? तुम्ही या ठिकाणी थांबा तेलंगणामध्ये तुमच्याशिवाय निवडणुका होणार नाही का? तुम्ही गेला किंवा नाही. तरी भारतीय जनता पक्ष तिथे हारणारच आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
एक हिंदुरुदय सम्राट दुसरे उप हिंदुरुदय सम्राट त्या ठिकाणी चाललेलं आहे. अजित पवार यांच्या पक्षात एवढे मोठे मोठे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांनी त्याच्यावरती बोललं पाहिजे. नवले की नाही त्यांनी 2024 साली पासून जनता त्यांना सत्तेपासून लांब ठेवणार आहे. आमच्यात कुठलेही मतभेद नाही सावधान आणि आरामात आम्ही या लोकसभेत लढणार आहोत. लोकसभा निवडणुकीमध्ये 48 जागा आम्ही जिंकणार आहोत, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.