संजय राऊतांचा वार; शिंदेगटाच्या तीन नेत्यांकडून पलटवार, वाचा…

| Updated on: Dec 13, 2023 | 12:52 PM

Shivsena Shinde Group Leaders on Sanjay Raut Statement : धनुष्यबाण आमचा म्हणणारे कमळाबाईचे गुलाम आहेत. शिंदे गट कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी शिंदे गटावर केला. त्यांच्या या टीकेवा तीन नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. वाचा सविस्तर...

संजय राऊतांचा वार; शिंदेगटाच्या तीन नेत्यांकडून पलटवार, वाचा...
Follow us on

मुंबई | 13 डिसेंबर 2023 : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे शिंदे गटावर वारंवार टीका करताना दिसतात. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने संजय राऊत यांनी पुन्हा शिंदे गटावर निशाणा साधला आहे. शिंदे गट कमळाबाईच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहे, असं संजय राऊत म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटातील नेत्यांनी पलटवार केला आहे. शिंदे गटातील तीन नेत्यांनी त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट, उदय सामंत, राहुल शेवाळे यांनी या टीकेला उत्तर दिलं आहे. तर भाजपकडूनही यावर प्रतिक्रिया आली आहे.

शिरसाट म्हणाले…

शिवसेनेचे उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर लढणार आहेत. शिंदे गट कमळावर निवडणूक लढणार ही बातमी खोटी आहे. हे बातमी पेपरमध्ये संजय राऊत यांनीच पेरली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांशी भरत गोगावलेंची तुलना करत आहेत. संजय राऊत हा भुंकणारा कुत्रा, त्याने भुंकत राहावं. हत्ती चले बाजार कुत्ते भोंके हजार अशी संजय राऊतची अवस्था आहे. शिवसेनेचे सर्व खासदार धन्युष्यबाणावर निवडणूक लढवणार आहे. यावर कुणीही शंका घेऊ नये, असं शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

उदय सामंतांचं प्रत्युत्तर

मंत्री उदय सामंत यांनीही राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. शिवसेनेचे उमेदवार कमळावर लोकसभा लढणार या अफवा पसरवल्या जात आहेत. निवडणूक आयोगाने चिन्ह आम्हाला दिलंय. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हावरंच शिवसेनेचे उमेदवार लोकसभा निवडणुका लढणार आहोत.

शेवाळे यांचा पलटवार

शिंदे गटाचे नेते, खासदार राहुल शेवाळे यांनी राऊतांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. आम्ही 13 खासदार बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जाणार आहोत. सर्व खासदार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. काहीजण अफवा पसरवत आहेत. अशी कोणतीही चर्चा वरिष्ठ पातळींवर झाली नाही. परंतु शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची यापूर्वी चर्चा झालीय, राहुल शेवाळे म्हणालेत.

भाजपची प्रतिक्रिया

तर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. कमळावर निवडणूक लढवण्याबाबत मला कल्पना नाही. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि भाजपचे वरिष्ठ नेते याबद्दल निर्णय घेतील. पण अद्याप असं काही काही ठरलं नाहीये, असं प्रवीण दरेकर म्हणालेत.