मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर एसी लोकलच्या आणखी 10 फेऱ्या, पाहा कधी पासून वाढणार फेऱ्या

| Updated on: Oct 31, 2023 | 10:05 PM

मध्य रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेवरून आणखी दहा एसी लोकलच्या फेऱ्या धावणार आहेत. या नवीन दहा फेऱ्या धिम्या असून त्यातील एक फेरी सकाळच्या पिकअवरला तर एक फेरी सायंकाळच्या पिकअवरला धावणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर एसी लोकलच्या आणखी 10 फेऱ्या, पाहा कधी पासून वाढणार फेऱ्या
ac local
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई | 31 ऑक्टोबर 2023 : मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने आपल्या मुख्यमार्गावरील एसी लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे मुख्य मार्गावर 6 नोव्हेंबरपासून आणखी 10 वातानुकूलित फेऱ्या सुरु करणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मार्गावरील रोजच्या एकूण एसी लोकलची संख्या 56 वरुन 66 इतकी होणार आहे. मात्र मध्य रेल्वेवरील एकूण लोकल फेऱ्यांची संख्या मात्र पूर्वीप्रमाणेच 1810 रहाणार असल्याने या दहा नवीन एसी फेऱ्या साध्या लोकलच्या बदल्यात चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना नवीन वेळापत्रक पाहून आपल्या प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर 6 नोव्हेंबर पासून आणखी 10 वातानुकूलित धीम्या लोकल धावणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलची संख्या 66 होणार आहे. या दहा नव्या एसी लोकल फेऱ्यांमध्ये एक सकाळच्या पिकअवरमध्ये आणि एक सायंकाळच्या पिकअवरमध्ये चालविण्यात येणार आहे. या एसी लोकल सोमवार ते शनिवार चालविण्यात येतील. रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांना त्या धावणार नसल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.

ac local time table –

10 ac local time table

असे आहे धीम्या 10 एसी लोकलचे वेळापत्रक –

1 ) कल्याण – स. 7.16 वा. – सीएसएमटी – स. 8.45 वा.

2 ) सीएसएमटी – स.8.49 वा. – कल्याण – स. 10.18 वा.

3 ) कल्याण – स. 10.25 वा. – सीएसएमटी – स.11.54 वा.

4 ) सीएसएमटी -स.11.58 वा. – अंबरनाथ – दु. 1.44 वा.

5 ) अंबरनाथ -दु. 2.00 वा.- सीएसएमटी – दु.3.47 वा.

6 ) सीएसएमटी – दु. 4.01 वा.- डोंबिवली – सायं.5.20 वा.

7 ) डोंबिवली – सायं. 5.32 वा. – परळ – सायं.6.38 वा.

8 ) परळ – सायं.6.40 वा. – कल्याण – रा.7.54 वा.

9 ) कल्याण – रा. 8.10 वा.- परळ – रा. 9.25 वा.

10 ) परळ – रा. 9.39 वा. – कल्याण – रा. 10.53 वा.

मध्य रेल्वेवर सध्या एसी लोकलच्या एकूण 56 फेऱ्या चालविण्यात येत आहेत. त्यात सीएसएमटी ते बदलापूर-टिटवाळा सेक्शनमध्ये 44 वातानुकूलित फेर्‍या तर उर्वरित फेऱ्या हार्बरवरील सीएसएमटी ते पनवेल – गोरेगाव मार्गावर चालविण्यात येत आहेत.