मुंबईः मुंबईमध्ये मान्सून (Mumbai Mansoon) लवकरच दाखल होणार असल्याने प्रत्येक यंत्रणेसोबत आढावा घेतला जात आहे. मुंबईत मान्सुनचे आगमन होणार असल्याने शहरातील 105 टक्के नालेसफाई (Nalesafai) पूर्ण करण्यात आली आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ संजीव कुमार आणि पी वेलारसु पत्रकार परिषदेत दिली आहे. शहरी भागात पावसाळ्यामध्ये समस्या निर्माण होऊ नये यासाठी मिठी नदीत 98 टक्क्यांची कामं पूर्ण करण्यात आली आहेत. राहिलेली 2 टक्के काम दोन दिवसात पूर्ण करण्यात येतील असंही यावेळी सांगण्यात आले आहे.
पावसाळ्यात पाणी साठून, किंवा गटारी तुंबून नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून (Mumbai Municipal Corporation) दखल म्हणून 487 ठिकाणी पंप बसवणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
गाळ काढण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून आढावा घेऊन आम्ही सूचना दिल्या असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली आहे.
पावसाळ्यापूर्वी कामं करण्यात आल्याने आता 386 पैकी 282 स्पॉटमध्ये आता पाणी भरणार नाही असा विश्वासही यावेळी आयुक्तांनी व्यक्त केला आहे. तर जोरदार पाऊस सुरु होण्यापूर्वीच उरलेल्या 104 पैकी 30 ठिकाणी राहिलेली कामं पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईत एनडीआरएफच्या 5 टीम असतील त्याच बरोबर नेव्हीच्या 15 टीम तर आर्मी अधिकाऱ्यांसोबतसुद्धा आम्ही मदत घेत राहणार आहेत.
मुंबईतील खड्याबाबत आणि विशेषतः पावसाळ्यात एमएमआरडीएने त्यासाठी स्पेशल टीम कार्यरत असणार आहेत. खड्डे बुजविण्यासाठी एजन्सी अपॉइंट केली आहे असून या कामासाठी स्पेशल टीम काम करणार आहे.
याबरोबरच या गोष्टींची माहितीसाठी मोबाइल अॅपसुद्धा सुरू राहणार असून ज्यामध्ये नागरिक तक्रार करू शकणार आहेत. त्यामध्ये 24 तासात तक्रार निवारण केली जाणार आहे. त्यामुळे महानगरपालिका आयुक्तांनी सांगितले की, कुठलेही मॅनहोल्स उघडे राहणार नाहीत याची खबरदारी घ्यावी अशा सुचनाही यावेळी देण्यात आली आहे.
शासकीय निमशासकीय संस्थांच्या ठिकाणी डास प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आली आहे. कोरोना रुग्ण संख्या मुंबईत वाढती आहे मात्र मागील 2 वर्षांपासून आपण कोव्हीड हाताळत आहोत. आम्ही सर्व रुग्णालयात आढावा घेऊन तयारी करायला सांगितली असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ संजीव कुमार यांनी सांगितली. जम्बो कोव्हीड सेंटर व इतर मोठ्या रुग्णालयानासुद्धा अलर्ट देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे टेस्टिंग वाढावायला सांगितले असून मुंबईत 500 केसेस रोज वाढत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
आपल्याकडे या केसेस हँडल करण्यासाठी पूर्ण क्षमता असून आम्ही आरोग्य विभागासोबत, डीन यांच्यासोबत बैठक घेतली आहे. आज रोज 8 हजार कोरोना टेस्ट होतायेत ते वाढवावा लागणार असल्याची सूचना त्यांनी यावेळी दिली आहे.
हिंद मातामध्ये 3 कोटी लिटर पाणी साठवून ठेवू शकतो, यामुळे साधारणपणे 3 तासापर्यंत पाण्याचा निचरा होऊ शकतो असेही डॉ. संजीव कुमाल यांनी सांगितले. हिंदमाता प्रकल्पामध्ये वॅाटर होल्डिंग्स टॅन्कमध्ये काम पूर्ण झाले आहे. छत टाकण्याची कामं बाकी असून प्रमोद महाजन गार्डनमध्ये रेल्वे नजीकच्या एक्सपान्शन काम पावसाळ्यानंतर होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.