वंदेभारत ट्रेनच्या मेन्टेनन्स डेपोंसाठी 18 हजार कोटी

| Updated on: Jan 10, 2023 | 4:03 PM

‘वंदेभारत ट्रेन’ ही विना इंजिनाची लांबपल्लयासाठी धावणारी ट्रेन असून तिला स्वंतत्रपणे इंजिन जोडण्याची गरज लागत नाही. पहीली वंदेभारत दिल्ली ते वाराणसी दरम्यान चालविण्यात आली होती. सध्या देशातील चार रेल्वे कारखान्यात ‘वंदे भारत’ ट्रेनची निर्मिती सुरू आहे.

वंदेभारत ट्रेनच्या मेन्टेनन्स डेपोंसाठी 18 हजार कोटी
vande-bharat
Image Credit source: vande-bharat
Follow us on
मुंबई : ‘मेक इन इंडिया’ ( MakeInIndia ) मोहिमेंतर्गत आरामदायी आणि वेगवान प्रवासासाठी तयार केलेल्या सेमी हायस्पीड ( SemiHighSpeed ) वंदेभारत ( vandebharat) ट्रेनच्या मेन्टेनन्स डेपोसाठी रेल्वे तब्बल 18 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. देशात चारशेहून अधिक वंदेभारत ट्रेन चालविण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 75 वंदेभारत येत्या ऑगस्ट  2023 पर्यंत दाखल होतील असे सूत्रांनी म्हटले आहे.
देशातील चारशे शहरांमध्ये वंदेभारत ही अत्याधुनिक सेमी हायस्पीड ट्रेन चालविली जाणार आहे. या ट्रेनच्या देखभालीसाठी मेन्टेनन्सची सुविधा तयार करण्याचे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे. देशभरात सध्या 58 मेन्टेनन्स डेपोंमध्ये 100 वंदेभारतच्या डागडुजी करण्याची तयारी झाली आहे. प्रत्येक जलदगतीने वंदेभारत उपलब्ध होण्यासाठी देखभाल आणि दुरूस्तीसाठी गुंतवणूक केली जात आहे.
डेपो अपग्रेडकरण्यासाठी 312 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. सध्या देशात सात वंदेभारत धावत आहेत, त्यात 30 डिसेंबर 2022 रोजी हावडा ते जलपैयगुरी दरम्यान नवीन वंदेभारत सुरू करण्यात आली आहे. देशभरात येत्याकाही काळात अनेक वंदेभारत ट्रेन दाखल होत असून त्यांच्या मेन्टेनन्ससाठी ही सज्जता करण्यात येत आहे. येत्या ऑगस्टपर्यंत 2023 पर्यंत देशात 75 वंदेभारत ट्रेन दाखल होतील असे रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ठ केले आहे.
400 वंदेभारत ट्रेन विविध शहरांना जोडल्या जाणार असून प्रवाशांना अत्यंत आरामदायी प्रवास करायला मिळणार आहे.  विशेष म्हणजे तिची प्रवासी वाहण्याची क्षमता ही ‘शताब्दी एक्स्प्रेस’ पेक्षा अधिक आहे. ‘वंदेभारत ट्रेन’ ही विना इंजिनाची लांबपल्लयासाठी धावणारी ट्रेन असून तिला स्वंतत्रपणे इंजिन जोडण्याची गरज लागत नाही. पहीली वंदेभारत दिल्ली ते वाराणसी दरम्यान चालविण्यात आली होती. सध्या देशातील चार रेल्वे कारखान्यात ‘वंदे भारत’ ट्रेनची निर्मिती सुरू आहे.
अलिकडेच वंदेभारत ट्रेनच्या देखभालीची जबाबदारी मघ्य रेल्वेच्या  वाडीबंदर आणि पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी येथील कोच डेपोेंना देण्यात आली आहे. वंदेभारतच्या 75 रेकची निर्मिती प्रथम होणार असून त्यात जरी चेअरकारचे डबे असले तरी रात्रीच्या प्रवासासाठीची स्लिपरकोच वाली वंदेभारत दुसर्‍या फेजमध्ये तयार करण्यात येणार आहे.
वंदेभारत ही विनाइंजिनाची 16 डब्यांची ट्रेन असून तिच्या दर एका डब्यामागे एक मोटरकोचचा डबा जोडलेला आहे. त्यामुळे तिच्या पन्नास टक्के चाकांना मोटरची ताकद मिळते. तिचा कमाल वेग प्रति तास 160 कि.मी. इतका आहे. तिच्या मोटरसह सर्व इलेक्ट्रीक पार्ट्स डब्याच्या खालच्या भागात बसविलेले आहेत. ही ट्रेन सुरू होताच अवघ्या सात सेंकदात वेग पकडू शकते.