मोठी बातमी ! शिवसेना आणि धनुष्यबाण विकत घेण्यासाठी 2 हजार कोटींचा सौदा; संजय राऊत यांनी बॉम्ब फोडला

| Updated on: Feb 19, 2023 | 11:00 AM

माझी खात्रीची माहिती आहे.... चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत... हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे..

मोठी बातमी ! शिवसेना आणि धनुष्यबाण विकत घेण्यासाठी 2 हजार कोटींचा सौदा; संजय राऊत यांनी बॉम्ब फोडला
Follow us on

मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज गंभीर आरोप केला आहे. शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्यासाठी 2 हजार कोटींची डील झाली आहे. गेल्या सहा महिन्या न्याय विकत घेण्यासाठी हा मोठा सौदा करण्यात आला आहे. हा न्याय नाहीये. ही डील आहे. हा सौदा आहे. हा विकत घेतलेला न्याय आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना हा आरोप केला आहे.

TV9 Marathi Live | Shivsena Name & Symbol | Thackeray vs Shinde | Eknath Shinde | Uddhav Thackeray

हे सुद्धा वाचा

संजय राऊत यांनी निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हा गंभीर आरोप केला. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी दोन हजार कोटीचा व्यवहार झाला आहे. त्याचे पुरावे लवकरच येतील. मी खात्रीने सांगतो ही डील झाली आहे. हा सौदा आहे. जो पक्ष नगरसेवक आणि शाखाप्रमुखांना विकत घेण्यासाठी 50 लाख देतोय, आमदारांना विकत घेण्यासाठी 50 कोटी आणि खासदारांना विकत घेण्यासाठी 100 कोटी देतात तो पक्ष शिवसेना हे नाव घेण्यासाठी किती मोठा सौदा करून बसला असेल याचा हिशोब लागणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

100 ऑडिटर लागतील

हा हिशोब करण्यासाठी 100 ऑडिटर लागतील. हा न्याय नाही. हे डील आहे. हा सौदा आहे. 2000 कोटी खर्च झाले. चिन्ह आणि पक्षाचं नाव विकत घेण्यासाठी किमान दोन हजार कोटी खर्च केल्याची माहिती त्यांच्या बिल्डरांनी मला दिली आहे. ते कुठे बसलेत ते सर्वांना माहीत आहे. आतापर्यंत दोन हजार कोटी खर्च झाले आहेत. मी माझ्या मतावर ठाम आहे, असं राऊत म्हणाले.

चार अक्षरांसाठी सौदा

हे सरकार खोक्यातून निर्माण झालं आहे. आज नगरसेवकांचे भाव शहरानुसार ठरवलं गेलं आहेत. त्यांची अनेक गोष्टी विकत घेण्याची तयारी सुरू आहे. ते मुंबईसह महाराष्ट्रही विकत घेतील. एका चिन्हासाठी ही रक्कम लहान नाही. शिवसेना या चार अक्षरांसाठी हा सौदा झाला आहे, असा दावा त्यांनी केला.

 

ट्विटमध्ये काय म्हटलं…

संजय राऊत यांनी ट्विट करूनही ही गोष्ट उघड केली आहे. माझी खात्रीची माहिती आहे…. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत… हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे.. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील.. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते…