शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदारांचे रेट ठरले, कुणाची किती किंमत?; संजय राऊत यांनी आकडाच सांगितला

| Updated on: Feb 19, 2023 | 12:49 PM

शिवनेरीवर शिवप्रेमींना प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवाजी महाराज जनसामान्यांचे राजे होते. ते मावळ्यांचं राजे होतं. गरीबांचे राजे होते.

शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदारांचे रेट ठरले, कुणाची किती किंमत?; संजय राऊत यांनी आकडाच सांगितला
Sanjay Raut
Image Credit source: ani
Follow us on

मुंबई : शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्यासाठी 2 हजार कोटींची डील झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह देऊन दोन दिवस उलटले नाही तोच राऊत यांनी हा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. राऊत फक्त आरोप करून थांबले नाही तर त्यांनी आणखीही मोठे आरोप केले आहेत. शिवसेनेचे शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार आणि खासदार विकत घेण्याचे प्रयत्नही सुरू झाले आहेत. त्यांचेही रेट ठरले आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन हा खळबळजनक आरोप केला आहे. माझ्याकडे पक्की माहिती आहे. शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार आणि खासदारांचे रेट ठरले आहेत. शाखाप्रमुख आणि नगरसेवक विकत घेण्यासाठी 50 लाख रूपये दर ठरला आहे. आमदारांना विकत घेण्यासाठी 50 कोटी आणि खासदारांसाठी 100 कोटी रूपये दर ठरला आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

हे सुद्धा वाचा

मुंबईही विकत घेतील

पक्षाचं नावं आणि चिन्ह विकत घेण्यात आलं आहे. 2 हजार कोटी रूपये यासाठी खर्च करण्यात आले आहेत. त्यांच्या मित्र परिवारातील बिल्डरांनीच ही रक्कम दिली आहे. खुद्द या बिल्डरांनीच आम्हाला ही माहिती दिली आहे, असा दावा राऊत यांनी केला. आज पक्ष आणि चिन्ह विकत घेतलं. उद्या ते मुंबई आणि महाराष्ट्रही विकत घेतील, असा दावा त्यांनी केला आहे.

चाटूगिरी सुरू

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. हे लोक काय चाटत आहेत. ही चाटूगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती. चाटूगिरीचं ढोंग आहे. टोकाची चाटूगिरी सुरू आहे. ज्यांची चाटली जातेय ते आम्हाला न्याय देत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

महाराजांपासून तोडण्याचा प्रयत्न

शिवनेरीवर शिवप्रेमींना प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवाजी महाराज जनसामान्यांचे राजे होते. ते मावळ्यांचं राजे होतं. गरीबांचे राजे होते. नव्या सरकारने महाराजापासून जनतेला तोडण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि प्रेरणास्थानावरही मालकी हक्क सांगण्याचा प्रयत्न दिल्लीतून होतोय का? जर शिवनेरीवर सामान्यांना प्रवेश नसेल तर दिल्लीश्वर येऊन इथे दुकान उघडणार आहेत का?, असा सवाल त्यांनी केला.