मुंबई: केईएम आणि सेठ जीएस मेडिकल कॉलेजमधील 22 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व विद्यार्थी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षातील आहे. दुसरा डोस घेतल्यानंतरही या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे.
केईएम रुग्णालय व सेठ जीएस मेडिकल कॉलेजमधील २२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. मागील दोन-तीन दिवसांतच सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. या विद्यार्थ्यांसाठी क्रीडास्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात त्यांनी भाग घेतला होता. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्याचं सांगितलं जातं. कोरोनाची लागण झालेल्या या सर्व विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे वसतिगृह सील करण्यात येण्याची शक्यता आहे.
राज्यात गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाने आणखी 49 जणांचा मृत्यू झाला आहे. या साथीच्या विखळ्यात सापडलेल्या 1 लाख 39 हजार 11 जणांना आतापर्यंत प्राणास मुकावे लागले आहे तर एकूण 63,68,530 रुग्ण कोरोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. आतापर्यंत 1 लाख 39 हजार 11 रुग्ण कोरोनाने दगावले. काल 3 हजार 187 नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. दिवसभरात 3 हजार 253 रुग्ण बरे होऊन परतले घरी. तर राज्यात कालपर्यंत एकूण 63,68,530 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.26 टक्के एवढे झाले आहे.
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 5 हजारांनी वाढ झाली. कालच्या दिवसात देशात 23 हजार 529 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 311 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशातील सक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तीन लाखांच्या खाली आहे. गेल्या 24 तासात भारतात 23 हजार 529 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 311 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 28 हजार 718 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 37 लाख 39 हजार 980 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 30 लाख 14 हजार 898 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 48 हजार 62 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 2 लाख 77 हजार 20 इतके सध्याच्या घडीला सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 88 कोटी 34 लाख 70 हजार 578 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 30 September 2021https://t.co/YxYKSsEAi4#mahafast100newsbulletin #mahafast100news #marathinews
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 30, 2021
संबंधित बातम्या:
Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा मोठी वाढ, आकडा 25 हजारांच्या पार
राज्यपाल भवन आता राजकीय अड्डा झालाय; नवाब मलिक यांची घणाघाती टीका
(22 students test positive for COVID in kem and seth gs medical college at mumbai)