रायगड: मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे वर ट्रक आणि दोन कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन ते चार जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईहून पुण्याकडे जात असताना आडोशी बोगद्याजवळ ही भीषण दुर्घटना घडली.
सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकने इनोव्हा आणि एका कारला धडक दिली. त्यामुळे दोन्ही कार ब्रिजवरुन खाली कोसळल्या. याच दुर्घटनेत दोन्ही कारमधील तीन ते चार जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.
सध्या पोलीस आणि आयआरबी टीमकडून मदत आणि बचावकार्य सुरु केलं आहे.