मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील (Mumbai Municipal Area) 11 प्रभागांमध्ये चार दिवस पाच टक्के पाणीकपात (water drop) करणार असल्याचे महापालिकेच्या पाणी विभागाने जाहीर केले आहे. ही पाणीकपात 24 मे ते 27 मे या कालावधीत होणार आहे. 4 दिवस होणारी पाणी कपात मुंबईतील (Mumbai) कुलाबा ते मुलुंडपर्यंत असणार आहे. विशेष म्हणजे सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत 5 टक्के पाणीकपात करण्यात येईल. त्यामुळे पाणी जपून वापरा असं आवाहन महापालिकेच्या पाणी विभागाकडून करण्यात आलं आहे. पिसे-पांजरापोळ येथे दुरूस्तीच्या कारणास्तव ही पाणीकपात करण्यात येणार आहे.
11 ते दुपारी 4 या वेळेत 5 टक्के पाणीकपात
बीएमसी पाणी विभागाच्या माहितीनुसार, पिसे-पांजरापोळ येथील 100 किलोवॅट वीज उपकेंद्राच्या दुरुस्तीचे काम होणार आहे. हे काम पुर्ण व्हायला चार दिवस लागणार आहे. त्या चार दिवसात सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत पाणी पुरवठा पुर्णपणे करण्यात येणार आहे. दुरूस्तीच्या कामामुळे 11 प्रभागांमध्ये पाणी कपात होणार आहे. मे महिना सुरू असून उष्णता प्रचंड असल्याने पाणी जपून वापरण्याचे आव्हान करण्यात पाणी विभागाने केले आहे. तसेच पाऊस सुरू होण्यापुर्वी पिसे-पांजरापोळ येथील दुरूस्ती महत्त्वाची आहे. त्यामुळे मुंबईतील कुलाबा ते मुलुंडपर्यंत मंगळवार 24 मे ते 27 मे या कालावधीत पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
11 प्रभागांमध्ये पाणी कपात
दुरूस्तीच्या कामादरम्यान मुंबईतील अ वॉर्ड ते टी वॉर्ड म्हणजेच कुलाबा, फोर्ट, भायखळा, माझगाव, वडाळा, शिवडी, सायन, माटुंगा, धारावी, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, भांडुप, कांजूरमार्ग, मुलुंड आदी भागात ५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाणीसाठा
तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा तलावातही गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाणीसाठा आहे. मुंबई शहराला दररोज 3 हजार 85 कोटी लिटर पाणीपुरवठा होत असल्याने सध्याचा पाणीपुरवठा जुलैअखेर पुरेसा होणार आहे. गेल्या वर्षी मध्य वैतरणा तलावात २२ टक्के पाणीसाठा होता. मात्र, यंदा 38 टक्के पाणीसाठा आहे.
जल अभियांत्रिकी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोडकसागर तलावातही गेल्या वर्षी ३४ टक्के पाणीसाठा होता, मात्र यंदा तो ४९ टक्के आहे.