मुंबई: शुद्र राजकारण ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत देशातील परिस्थिती बदलणार नाही, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले. देशात जात व धर्मावरून राजकारण सुरु आहे. यामुळे देशाचं विघटन होईल, असा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता. हजारो वर्षांच्या गुलामगिरीमुळे देश काहीच शिकला नाही. आजही विचारांची गुलामी सुरु असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. (Prakash Ambedkar on religious politics in India)
प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील धार्मिक राजकारणावर टीका केली. भारतात हिंदुंची लोकसंख्या 80 टक्के असताना देशात धार्मिक राजकारण करण्याची गरजच काय, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी मनपा, नगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात. कोणीही एकमेकांशी युती करु नये. प्रत्येक पक्षाने आपली संघटना टिकवावी, असे माझे मत आहे. युतीच्या राजकारणात पक्ष लयास जातो, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
संजय राऊतांना पैसा हा राऊतांकडूनच आला. त्यांच्यात नात्याचे संबंध नाहीत, असे ईडीचे म्हणणे आहे. तेव्हा संजय राऊत यांनी 55 लाख कशासाठी आलेत, याचा खुलासा करावा. म्हणजे संजय राऊत मोकळे होतील, असे आंबेडकर यांनी म्हटले.
नेते हे व्यापारी आणि राजकर्ते एकाच वेळी झाले की ईडी मागे लागते. राजकारण करताना चारित्र्य मोकळे हवे. ईडीने रेड केली म्हणजे तुम्ही टॅक्सेस भरलेले नाहीत. इथल्या व्यापारी कारखानदारांच्या मागेही ईडी लागली आहे. व्यापारी म्हणून काम करताय तर राजकारणाचं शिल्ड घेऊ नये, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
कोरेगाव भीमा येथील लढाईचा इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामध्ये समावेश झाला पाहिजे, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाई नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली. रामदास आठवले यांनी शुक्रवारी कोरेगाव भीमा येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. कोरेगाव भीमाचा (Bhim Koregaon) इतिहास शाळांमध्ये शिकवला गेला पाहिजे. त्यासाठी मी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहीन व त्यांच्याशी चर्चाही करेन, असे रामदास आठवले यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
भीमा कोरेगावच्या इतिहासाचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश करा; रामदास आठवलेंची मागणी
लोकं सांगतात अन् सरकार फक्त आदेश काढतं; शासनाकडे कोणताच ठोस प्लॅन नाही: प्रकाश आंबेडकर
(Prakash Ambedkar on religious politics in India)