तब्बल 9 लाख लोकांनी मुंबई सोडली!

| Updated on: Aug 12, 2019 | 1:07 PM

अनेक स्वप्न उराशी बाळगून मुंबईची वाट धरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दिवसागणिक असे अनेक लोक मुंबईत आसरा घेतात. मात्र, असाही एक वर्ग आहे जो मुंबईच्या आजूबाजूला निवारा शोधतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार मागील 10 वर्षात मुंबईतील 9 लाख लोकांनी मुंबईबाहेर स्थलांतर केले आहे.

तब्बल 9 लाख लोकांनी मुंबई सोडली!
Follow us on

मुंबई : अनेक स्वप्न उराशी बाळगून मुंबईची वाट धरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दिवसागणिक असे अनेक लोक मुंबईत आसरा घेतात. मात्र, असाही एक वर्ग आहे जो मुंबईच्या आजूबाजूला निवारा शोधतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार मागील 10 वर्षात मुंबईतील 9 लाख लोकांनी मुंबईबाहेर स्थलांतर केले आहे. यापैकी एकट्या ठाण्यात यापैकी 8 लाख लोकांचे स्थलांतर झाले आहे.

या मोठ्या प्रमाणातील स्थलांतरनामुळे 2001 ते 2011 दरम्यान ठाण्याच्या लोकसंख्येत 29.3 लाखांची भर पडली. यापैकी 8 लाख लोक दक्षिण मुंबईतून येथे स्थलांतरित झाले. उपनगरीय भागातून ठाण्यात होणारे स्थलांतर 2001 ते 2011 मध्ये 10 पटीने वाढले आहे. ही वाढ 30 हजार 128 वरुन 3.9 लाख अशी आहे. हे स्थलांतर होण्यामागील मुख्य कारण शहरातील गर्दीच्या तुलनेत ठाण्यात राहण्यासाठी घरांची सहज होणारी उपलब्धता हे आहे. मुंबईत घर खरेदी करणे बहुतांशी बजेटच्या बाहेर गेलं आहे. मुंबईतील मिल बंद झाल्याने पूर्वी मिलमध्ये काम करणाऱ्या अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे लोक शहराच्या बाहेर आपल्या बजेटमधील घर घेत आहेत.

ज्यांची शहरात स्वतःच्या मालकीची घरं होती. त्यांना या घरांची मोठी किंमत मिळत असून या पैशात शहराबाहेर आहे त्यापेक्षा मोठी घरं मिळत असल्याने अनेकांनी तो पर्याय निवडला आहे. काही मध्यमवर्गीय कुटुंबांनी सुरुवातीला गुंतवणूक म्हणून घर, फ्लॅट घेतले. आता शहराबाहेरील या भागात वाहतूक व्यवस्था सुधारल्यामुळे त्या ठिकाणीच राहण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूकीच्या पर्यायांची उपलब्धता होत आहे तसा लोकांचा शहराच्या बाहेर राहण्याचा कलही वाढत आहे. प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा खर्च करावे लागणारे पैसे अधिक असल्याने अनेकजण बाहेर जाण्याचा व्यवहारी मार्ग निवडत आहेत.

2001 पासून आपले स्वतःचे घर खरेदी करण्याचा ट्रेंड आहे. त्यामुळे लोक आपलं स्वतःचं घरं खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाशी, सानपाडा, मिरा भायंदर सारख्या ठिकाणांचा पर्याय निवडत आहेत. ठाण्यात झालेल्या लोकसंख्येच्या विस्फोटामुळे तेथील प्रशासनाला जिल्ह्याचे दोन भाग करावे लागले. ठाण्यानंतर लोकसंख्या स्थलांतराचा प्रवास कल्याण, उल्हासनगर, भिवंडी आणि पालघर या ठिकाणीही होत आहे. आगामी काळात मुंबईतून बाहेर स्थलांतरित होणाऱ्यांसाठी रायगड हे नवे आकर्षण असेल, असा अंदाज नगरविकास व्यवस्थापकांकडून व्यक्त केला जात आहे.